आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीच्या मृत्यूची बातमी ऐकून प्रियकराने घेतले विष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नालंदा- बिहारच्या नालंदा जिल्ह्यात एका जोडप्याने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विषाच्या प्रभावामुळे प्रेयसीचा मृत्यू झाला, तर प्रियकराची अवस्था गंभीर आहे. त्याला उपचारासाठी रुग्नालयाद दाखल करण्यात आले आहे. नालंदा जिल्ह्यातील मिर्जा बिगहा गावातील ही घटना आहे.


प्रेयसीचे होणार होते लग्न...
मिर्जा बिगहा गावातील रामनंदन केवट यांची मुलगी गावातील विकास कुमारवर प्रेम करत होती. तरूणीच्या कुटुंबीयांना याविषयी कळाले तेव्हा त्यांनी मुलीला घराबाहेर पडण्यास मनाई केली होती. तसचे कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी लावून देण्याचा प्रयत्न केला. तरूणीला हे मंजूर नव्हते. त्यामुळे तरूणीने मंगळवारी रात्री विष घेऊन आत्महत्या केली.


प्रेयसीच्या मृत्यूची बातमी विकास कुमारला बुधवारी सकाळी मिळाली. यानंतर त्याने देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, कुटुंबीयांनी त्याला वेळीच रुग्नालयात दाखल केले. नालंदा येथील एका खाजगी रुग्नालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तरूणींच्या कुटुंबीयांनी पूरावा मिटवण्यासाठी मृतदेहावर चोरून लपून अंत्यसंस्कार केले. घटनेनंतर तरूणीचे कुटुंबीय गाव सोडून पळून गेले. या संबंधी नालंदा ठाण्याचे प्रमुख विगायु राम यांनी याविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले.


पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा नेमके काय घडले...