आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडाला लटकलेले होते प्रेमी युगुल, पोलिस तपासात समोर आले घरातून पळून गेले होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोंक (राजस्थान) - जिल्ह्यातील मेहंदवदास पोलिस स्टेशन अंतर्गत एका प्रेमी युगुलाने झाडाला फाशी घेऊन जीवनयात्रा संपवली. बुधवारी सोनवा अल्लापूर रोडवरील झाडाला प्रेमीयुगुलाचे मृतदेह लटकत असल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. 

 

- प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येची बातमी कळाल्यानंतर घटनास्थळी लोकांनी गर्दी केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस अधिकारी संजय शर्मा घटनास्थळी दाखल झाले. 
- पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर आसपास विचारपूस करुन दोन्ही मृतदेह खाली उतरवले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. 

 

घरातून पळून गेले होते युवक-युवती 
- पोलिसांनी सांगित्यानुसार, सोनवा-अल्लापूर रोडवरील झाडाला लटकत असलेले युवक-युवती ऊमा गावचे रहिवासी होते. 
- दोघेही द्वितीय वर्षाला शिकत होते. त्यांचे अफेअर होते. काही दिवसांपूर्वी ते त्यांच्या घरी कळाले आणि तेव्हापासून दोघे बेपत्ता होता. 
- प्राथमिक तपासानुसार प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र पोलिस या घटनेची सर्व बाजूने चौकशी करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...