आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासपोर्टसाठी धर्म बदलण्यास सांगणाऱ्या अधिकाऱ्याची बदली, लखनऊत घडला होता प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- पत्नीने सुषमा स्वराज यांच्याकडे याची तक्रार केली होती 

- तन्वीने 2007 मध्ये अनस बरोबर लव्ह मॅरेज केले होते 

 

लखनऊ - मुस्लीम तरुणाला हिंदु धर्म स्वीकारण्याचा सल्ला देणारे पासपोर्ट अधीक्षक विकास वर्मा यांची बदली करण्यात आली आहे. तसेच संबंधित तरुणाला पासपोर्टदेखिल जारी करण्यात आला आहे. युवकाची पत्नी हिंदु असून तिनेच ट्वीटरवर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे यासंबंधी तक्रार केली होती. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, तन्वी सेठ नावाची महिला पती अनस सिद्दीकीबरोबर बुधवार पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी पासपोर्ट ऑफिसला गेली होती. तेव्हा विकास वर्माने त्यांच्याबरोबर गैरवर्तन केले. अधिकाऱ्याने तन्वीला म्हटले की, तुमची तर अडचण आहे. तुम्ही मुस्लीमबरोबर लग्न केले आहे. मग तुमचे नाव तन्वी सेठ कसे असू शकते. तुम्ही तुमचे नाव बदलून घ्याने हे तुमचे कर्तव्य आहे. त्यांनी अनस यांनादेखिल हिंदु धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला. 


पूर्ण कागदपत्रे असतानाही दिला नकार 
तन्वी यांचे म्हणणे आहे की, पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे होते. तरीही त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला. तन्वी यांनी ट्वीटरवर यासंबंधी सुषमा आणि पीएमओकडे तक्रार केली. त्यावर कारवाई करण्यात आली. तन्वी यांनी 2007 मध्ये अनसबरोबर लव्ह मॅरेज केले होते. त्यांना एक सहा वर्षांची मुलगीही आहे. 

 

पुढे पाहा, संबंधित PHOTOS

बातम्या आणखी आहेत...