आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रासोबत या दोन राज्यांचाही अर्थसंकल्प, हरियाणात नाही कोणताही नवा टॅक्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रासह हरियाणा आणि हिमाचलचा आज अर्थसंकल्प सादर झाला. - Divya Marathi
महाराष्ट्रासह हरियाणा आणि हिमाचलचा आज अर्थसंकल्प सादर झाला.

मुंबई/चंदीगड/पानीपत/शिमला - महाराष्ट्रासोबतच आज हरियाणा आणि हिमाचल सरकारचाही अर्थसंकल्प सादर झाला आहे. महाराष्ट्रात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर हरियाणामध्ये अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू आणि हिमाचलमध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. या तिन्ही राज्यांमध्ये एक समानता आहे, ती म्हणजे या तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. 

 

हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा पहिला अर्थसंकल्प
- भाजपच्या कार्याचा गौरव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा उल्लेख करत बजेट भाषण केले. यामध्ये त्यांनी शेरो-शायरीचीही पेरणी केली होती. ठाकूर यांनी भाषणाच्या सुरुवातीला म्हटले की, ' मुझे ऊंचाईयों पर देखकर हैरान हैं कुछ लोग, लेकिन उन्‍होंने मेरे पांव के छाले नहीं देखे.'
- पावणे तीन तासांच्या आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्री ठाकूर यांनी समाजातील प्रत्येक वर्गाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.  

 

हरियाणात कोणताही नवा टॅक्स नाही
- हरियाणाचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यांनी मनोहरलाल खट्टर सरकारचा चौथा अर्थसंकल्प शुक्रवारी हरियाणा विधानसभेत सादर केला. जीएसटी लागू झाल्यानंतर राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प होता. 
- या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणताही नवा टॅक्स लावण्यात आलेला नाही. 
- अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री म्हणाले, हरियाणा आणि हरियाणवी भावना लक्षात घेऊन अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. वर्ष 2018-19 साठी 1 लाख 15 हजार 198.29 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या (2017-18) तुलनेत 12.6 टक्क्यांनी हा अधिक आहे.

 

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, हरियाणा, हिमाचल आणि महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून काय निघाले...

बातम्या आणखी आहेत...