आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण Accident: कार-ट्रकच्या धडकेत दोन्ही वाहने पेटली, एकाच कुटुंबातील 8 ठार, एक जण गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - राजकोट-मोरबी हायवेच्या जवळ मंगळवारी रात्री एक मोठा रस्ते अपघात झाला. मोरबी जिल्ह्याच्या टंकारा वस्तीत इको कार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांमध्ये आग लागली. यात कारमध्ये स्वार असलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे. राजकोटचे डीसीपी करणराज वाघेला म्हणाले, सर्व मृत एकाच कुटुंबातील सदस्य आहेत, जखमीवर उपचार सुरू आहेत.

 

सूत्रांनुसार, मंगळवारी रात्री 9 वाजता मोरबीवरून येत असलेल्या कारमध्ये राजकोटच्या कुटुंबातील 5 जण तसेच ग्वाल्हेरातून आलेले त्यांचे 3 नातेवाईक (पति-पत्नी) प्रवास करत होते. टंकारा आणि कागदड़ीच्या दरम्यान बीच कार सांई शक्ती हॉटेलजवळ पोहोचली, तेवढ्यात कारची ट्रकला जोरात धडक बसली. यामुळे दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धमाका होऊन आग लागली. कुआड़वा पोलिसांच्या मते, कारमध्ये आग लागताच ड्रायव्हर गाड़ीतच फसला आणि जिवंत जळाला.

 

दुसरीकडे, कारमध्ये स्वार दोन भाऊ सागरभाई, बलवंतभाई आणि वडील रमेश भाई यांच्यासह पत्नी मीना बेन यांचाही जागेवरच मृत्यू झाला. मृतांमध्ये भावना बेन आणि राकेशभाई यांचाही समावेश आहे. अपघाताच्या एका तासानंतर फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचली. या अपघातातील जखमीला राजकोटच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ड्रायव्हरचे नाव आतापर्यंत कळू शकलेले नाही.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी Photos...

 

बातम्या आणखी आहेत...