आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • शैलजा हत्याकांड: मेजरची फेसबुकवर बनावट प्रोफाइल, स्वत:ला बिझनेसमन दाखवून आणखी 3 जणींना फसवले Major Handa Threaten By Shailja Dwivedi For Not To Follow

शैलजा हत्याकांड: मेजरची फेसबुकवर बनावट प्रोफाइल, स्वत:ला बिझनेसमन दाखवून आणखी 3 जणींना फसवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- मेजर हांडाने शैलजाला 6 महिन्यांत केले होते 3 हजार कॉल

- मेजर हांडा म्हणाला की, शैलजा त्याला कोर्ट मार्शलची धमकी द्यायची.

 

नवी दिल्ली - शैलजा हत्याकांडात पोलिस चौकशीत कळले की, मेजर हांडाने बनावट फेसबुक प्रोफाइल बनवून 2015 मध्ये शैलजाशी मैत्री केली होती. तेव्हा त्याची पोस्टिंग जम्मू-काश्मीरमध्ये होती. त्याने अशाच प्रकारे आणखी 3 महिलांशीही मैत्री केली होती. तो स्वत:ला बिझनेसमन असल्याचे सांगत होता.

कॉल डिटेलवरून कळते की, मेजर निखिल हांडाने शैलजा द्विवेदीला 6 महिन्यांत 3 हजार वेळा कॉल केले होते. हांडाने पोलिसांना सांगितले की, शैलजाने त्याला पाठलाग न सोडल्यास सैन्य अधिकाऱ्यांना तक्रार करून कोर्ट मार्शल करण्याची धमकी दिली होती. नोकरीवर संकट येत असल्याचे पाहून त्याने शैलजाची हत्या केली. दरम्यान, सोमवारी कोर्टाने त्याला 4 दिवसांच्या पोलिस कोठडीवर पाठवले.

 

शैलजाला मेजर हांडापासून दूर जायचे होते: 
काही दिवसांपूर्वी शैलजाला तिच्या पतीने निखिलसोबत व्हिडिओ कॉलिंग करताना पकडले. मेजर अमितने पत्नीला इशारा वॉर्निंग दिल्यावर ती निखिलपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करू लागली. तथापि, ती असे करू शकली नाही.

 

हांडाच्या घराजवळ आढळला शैलजाचा मोबाइल: 
पोलिसांनी शैलजाचा मोबाइल दिल्लीच्या साकेत येथील मेजर हांडाच्या घराबाहेर एका कचराकुंडीतून हस्तगत करण्यात आला आहे. दोघांच्या कॉल डिटेलवरून त्यांच्यातील दीर्घ बातचीत झाल्याचे कळले आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू हांडाच्या कारमध्ये आढळला. पोलिसांना आणखी एका चाकूचा शोध आहे. हत्येच्या वेळी त्याच्याकडे दोन चाकू असल्याचा पोलिसांना संशय आहे.

 

दीमापूरमध्ये शैलजाच्या घराजवळच राहायचा मेजर हांडा: 
मेजर हांडाने सांगितले की, मैत्री घट्ट झाल्याने त्याने शैलजाला खरे सांगितले होते की, तो बिझनेसमन नाही तर मेजर आहे. त्याचे ट्रान्सफरही श्रीनगरहून नागालंडच्या दीमापूरला झाले आहे. तो शैलजाच्या घराजवळच राहू लागला. शैलजाने आपल्या घरी एका पार्टीमध्ये हांडाला बोलावले होते. तेव्हा शैलजानेच आरोपीची पती अमितशी पहिल्यांदा भेट घालून दिली होती.

 

भाऊ आणि काकाचीही होणार चौकशी: 
डीसीपी वेस्ट विजय कुमार म्हणाले की, आरोपी निखिल हत्येनंतर आपल्या काका आणि भावाच्या संपर्कात होता. दोघांची या केसमध्ये भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांची चौकशी होईल. डीसीपी म्हणाले की, आरोपीविरुद्ध हत्येसोबतच पुरावे मिटवण्याचेही कलम जोडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचे आणखी Photos... 

बातम्या आणखी आहेत...