आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना जीपची धडक,सात मुलांसह 9 ठार;बिहारमधील मुझफ्फरपूरजवळील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुझफ्फरपूर- बिहारमधील मुझफ्फरपूरजवळील मीनापूर येथे शनिवारी दुपारी भरधाव आलेल्या बोलेरोने शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना चिरडले. या अपघातात ७ विद्यार्थ्यांसह दोन महिला जागीच ठार झाल्या, तर १० मुलांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये ७ विद्यार्थी, २ महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेत्याच्या नावाची पाटी असलेल्या बोलेरोने सुरुवातीला रस्ता ओलांडणाऱ्या मुलीस व तिच्या आईला उडवले. नंतर अनियंत्रित वाहनाने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या मुलांना चिरडले आणि वाहन खड्ड्यात जाऊन कोसळले.  


गावकरी मृतांना आणि जखमींना एसकेएमसी रुग्णालयात नेले तेथे आकांत सुरू झाला. घटनेनंतर बोलेरोचा चालक फरार झाला होता. शाळेतील शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली.   मुलांना शिक्षकाने रस्ता ओलांडण्यास मदत केली नाही, असा आरोप गावकऱ्यांनी केला. जमावाने सीतामढी-मुझफ्फरपूर रस्त्यावर दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. शाळेत जाऊन वर्गातील बेंच आणि डेस्कची तोडफोड करत आग लावली. घटनेनंतर शाळेतील शिक्षक पळून गेले होते.  

 

 

मृताच्या नातेवाइकांना चार-चार लाखांची मदत  
जिल्हाधिकारी व एसएसपी यांनी एसकेएमसी रुग्णालयात तसेच घटनास्थळीही भेट दिली. मृतांच्या पालकांना चार-चार लाखाचे धनादेश देण्यात आले. जखमीवर सरकारच्या खर्चाने उपचार करण्यात येतील, अशी घोषणा केल्यानंतर जमाव शांत झाला. जखमीच्या उपचारासाठी एसकेएमसी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स व परिचारिकांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या. त्यांना कामावर बोलावण्यात आले. अधीक्षक डॉ. जी. के. ठाकूर यांंनी जिल्ह प्रशासनाच्या उपस्थितीतच जखमीवर उपचार सुरू ठेवले आहेत.

 

अपघातानंतर गावावर शोककळा
- राष्ट्रीय महामार्ग 77 वर झालेल्या या भीषण अपघातानंतर धर्मपूर गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने लोकांची तेथे गर्दी झाली.
- मिनापूरचे स्थानिक आमदार मुन्ना यादवही रुग्णालयात पोहोचले व त्यांनी जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली. आमदार म्हणाले की, धडक मारणारी कार प्रचंड वेगात होती, आरोपी ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाला आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेशी संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...