आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 मुख्यमंत्री कोट्यधीश; दोनवेळा CM तरीही नाही स्वतःचे घर, एवढी आहे संपत्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सत्ता मिळाल्यानंतर राजकारण्यांच्या संपत्तीत कशी वाढ होते हे तुम्ही पाहिले असेल. मात्र दोनवेळा मुख्यमंत्री झाल्यानंतरही ममता बॅनर्जी यांच्या राहाणीमानात फरक पडलेला नाही किंवा त्यांच्या संपत्तीतही वाढ झालेली नाही. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसारस ममता बॅनर्जी यांच्याकडे फक्त 30 लाख रुपयांची संपत्ती आहे. या अहवालानुसार, देशातील 31 मुख्यमंत्र्यांपैकी 25 मुख्यमंत्री हे कोट्यधीश आहेत. 


- देशातील 81 टक्के मुख्यमंत्री हे कोट्यधीश असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे स्वतःचे घर देखील नाही. 
- 27 मे 2016 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथग्रहण केलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या या आजही अतिशय साधे जीवन जगतात. 200 हून अधिक जागा जिंकून त्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. 
- देशातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत ममता बॅनर्जी यांचा शेवटून दुसरा क्रमांक आहे. त्यांच्याकडे फक्त 30 लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्यानंतर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांचा क्रमांक लागतो. सरकार यांच्याकडे सर्वात कमी 26 लाख रुपये असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, एकहाती मिळवली सत्ता...

बातम्या आणखी आहेत...