आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी झाली म्हणून दिला Triple Talaq; पैसे आणि बाईक घेऊन येण्याची ठेवली अट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शामली - सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही ट्रिपल तलाकची प्रकरणे सुरुच आहेत. युपीच्या शामलीमध्ये एका व्यक्तीने पत्नीला केवळ तिने मुलीला जन्म दिला म्हणून तलाक दिला. मुलीचा जन्म झाल्यानंतर नवऱ्याने पत्नीला पैसे आणि बाइक आणण्याची अट ठेवली. मागणी पूर्ण झाली नाही तर सासरच्या मंडळींनी महिलेला घराबाहेर काढले. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सहारनपूरच्या गंगोह येथील राहणाऱ्या गुलिस्ताचे लग्न दीड वर्षांपूर्वी कैरानाच्या शाहीदबरोबर झाले होते. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, लग्नानंतर सासरची मंडळी मुलीला हुंड्यासाठी छळत होते. ती सासरी छळ सहन करून दिवस काढत होती. आठवडाभरापूर्वी तिने मुलीला जन्म दिला. 


मुलीच्या जन्मानंतर नरक बनले आयुष्य 
- गुलिस्ता म्हणाली की, मुलीच्या जन्मानंतर तिच्या पती आणि नातेवाईकांनी तिचे आयुष्य जणू उध्वस्त केले होते. पती तिला रोज मारहाण करत होता. त्यानंतर तीन तलाक देत तिला धक्का दिला. 
- पीडिता आणि तिच्या नातेवाईकांनी न्यायासाठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अपर पोलिस अधीक्षक श्लोक कुमार यांच्या तपास सुरू असून लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल. 
- गेल्यावर्षी 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने तीन तलाकला अवैध ठरवले होते. 


पोळी जळाल्याने दिला तलाक 
या महिन्यातच युपीच्या महोबामध्ये पोळी जळाल्यामुळे एका व्यक्तीने पत्नीला घटस्फोट दिला होता. 4 जुलै 2017 ला 24 वर्षीय रझिया हिचा निहाल खानबरोबर निकाह झाला. दुसऱ्याच दिवशी पतीने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तसेच तलाकच्या दिवशी रझियाने घर सोडण्यास नकार दिला तेव्हा तिला सिगारेटचे चटके देण्यात आले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...