आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cobra ने घेतला चावा; साप हातात धरून म्हणाला, पुन्हा चाव नाही तर मारून टाकेन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरदोई - किंग कोब्राचे नाव ऐकताच लोकांची भंबेरी उडते. परंतु, उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली. येथे एक माणूस गोडाऊनमध्ये असताना त्याला कोब्रा चावला. यावर तो माणूस इतका भडकला की त्याने सापाला उचलून हातात धरले आणि पुन्हा चाव-पुन्हा चाव असे ओरडायला लागला. लोक जमा झाले तेव्हा तो पुन्हा चाव नाही तर मारून टाकेन असे ओरडत होता. हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. यानंतर जवळपासच्या लोकांनी कसे-बसे त्या व्यक्तीचा हातातून कोब्रा हिसकावून फेकले आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. 

 

घरात भांडून आला होता सरफराज...
> स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कामीपूर गावात राहणारा सरफराज एका गोडाऊनमध्ये मजूरांचा कंत्राटदार आहे. तो घरात भांडण करून तावा-तावात गोडाऊनला पोहोचला होता. रागात बसलाच होता, की अचानक नाग बाहेर आला आणि सरफराजच्या बोटाचा चावा घेतला. 
> आधीच रागात असलेला सरफराज इतका चिडला की त्याने तो किंग कोब्रा असल्याचीही परवा केली नाही. त्या सापाला चक्क हातात धरले आणि त्याला धमक्या द्यायला लागला. "पुन्हा चाव नाही तर आताच कापून फेकेन तुला मारून टाकेन." असे तो ओरडत होता.
> प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, त्याचा आवाज ऐकूण सगळेच मजूर एकत्रित आले आणि हैराण होऊन ते दृश्य पाहायला लागला. कुणाला काहीच बोलण्याचे सूचत नव्हते. सरफराजच्या हातात आलेल्या सापाने मान फिरवून पुन्हा त्याच्या बोटाचा चावा घेतला. यानंतर लोकांनी कसे-बसे त्या सापाला सरफराजच्या हातातून फेकले आणि त्याला रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. 


जिवंत वाचला डॉक्टरही हैराण...
त्याला जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी उपचार केले असून तो सध्या धोक्यातून बाहेर आला आहे. परंतु, त्याची केस हिस्ट्री पाहून डॉक्टर सुद्धा हैराण झाले आहे. किंग कोब्राने दोनदा चावले. तरीही हा माणूस जिवंत कसा वाचला यावर सगळेच शॉक आहेत.

बातम्या आणखी आहेत...