आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • पती पत्नी एकमेकांच्या 'या' गोष्टींत देऊ शकत नाहीत दखल, होऊ शकते जेल Man Booked For Installing Camera In Flat To Spy On Wife

पती-पत्नी एकमेकांच्या 'या' गोष्टींत देऊ शकत नाहीत दखल, होऊ शकते जेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉलेज डेस्क - पुण्यात एका माजी पतीने पत्नीवर नजर ठेवण्यासाठी घरातील वॉटर प्यूरिफायरमध्ये स्पाय कॅमेरा लावला. हा कॅमेरा त्याने आपल्या मोबाइलला लिंक केला होता. मोबाइलच्या माध्यमातून तो बाहेर राहत असूनही आपल्या पत्नीवर नजर ठेवू शकायचा. पत्नीच्या जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा तिने आपल्या माजी नवऱ्याविरुद्ध FIR दाखल केली.

यानिमित्त आम्ही तुम्हाला 'राइट टू प्रायव्हसी'च्या त्या कायद्याबाबत सांगत आहोत, ज्या अंतर्गत या सर्व गोष्टी गुन्ह्याच्या श्रेणीत येतात. सुप्रीम कोर्टानेही निर्णय दिलेला आहे की, प्रायव्हसी मौलिक अधिकाराचा भाग आहे. 

 

कुणावरही पाळत ठेवली जाऊ शकत नाही...
- दिल्ली हायकोर्टाने म्हटले होते की, सासरी आल्यानंतर एखाद्या विवाहित पत्नीने प्रायव्हसीची मागणी करणे हे काही पतीसाठी क्रौर्य ठरत नाही. याला घटस्फोटाचा आधार बनवले जाऊ शकत नाही.

- प्रायव्हसी प्रत्येकाचा मौलिक अधिकार आहे. यामुळे एखाद्यावर पाळत ठेवता येत नाही.
- इतर कुणीही त्यांच्या प्रायव्हसीमध्ये दखल देऊ शकत नाहीत. यामुळे जेव्हाही एखादी महिला आपल्या सासरी जाते, तेव्हा तिच्या सासरच्या मंडळींचे हे कर्तव्य आहे की, तिला प्रायव्हसी प्रदान करावी.


काय आहे राइट टू प्रायव्हसी?
- हे संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत येते. गतवर्षीच सुप्रीम कोर्टाने याला मूलभूत अधिकाराचा भाग असल्याचे म्हटले.
- यामुळे कुणाच्याही पसर्नल डिटेल्स सार्वजनिक केल्या जाऊ शकत नाहीत. लग्न करणे, मुले जन्माला घालणे आणि सोबत कुटुंब असणे यासारखी प्रकरणे प्रायव्हसीशी निगडित आहेत.
- म.प्र. हायकोर्टाचे अॅडव्होकेट संजय मेहरा म्हणाले की, एखाद्याच्या रूममध्ये त्याच्या परवानगीविना कॅमेरा लावणे हे राइट टू प्रायव्हसीचे उल्लंघन आहे. असे केल्यास आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल होतो.
- मेहरा म्हणाले, राइट टू प्रायव्हसीमध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्य, प्रॉपर्टीचा अधिकार, बिझनेस करण्याचा अधिकार, खाणेपिणे यासह जगण्याचा अधिकारही सामील आहे.
- राइट टू प्रायव्हसीमध्ये अशीही तरतूद आहे की, जर पालक मुलाचा शारीरिक वा मानिसक छळ करत असतील आणि मुलाने याची तक्रार केली तर पालकांवरही या कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. 

बातम्या आणखी आहेत...