आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • ड्रायव्हर मुस्लिम असल्याने प्रवाशाने कॅन्सल केली Ola कॅब Man Cancelled Ola Cab Because Driver Was Muslim

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रायव्हर मुस्लिम असल्याने प्रवाशाने कॅन्सल केली Ola कॅब, ट्विटरवर टीकेचा भडिमार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिषेकने केलेल वादग्रस्त टविट्. - Divya Marathi
अभिषेकने केलेल वादग्रस्त टविट्.

लखनऊ - एका प्रवाशाने ओला कॅब बुक केली आणि मग काही वेळानंतर कॅन्सल केली, कारण काय तर- ड्रायव्हर मुस्लिम होता. याच्या प्रत्युत्तरात ओलानेही ट्विट केले आणि लिहिले की, कंपनी एक सेक्युलर प्लेटफार्म आहे जी आपल्या ड्रायव्हर आणि ग्राहकांमध्ये धर्म, लिंग वा पंथाच्या आधारे भेदभाव करत नाही.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- शहरातील अभिषेक मिश्रा नावाच्या व्यक्तीने एक ओला कॅब बुक केली होती.
- यानंतर अलर्टमध्ये जेव्हा त्याच्याकडे एक मुस्लिम ड्रायव्हरचे नाव आले तर त्याने कॅब कॅन्सल केली.
- कॅब कॅन्सल केल्यानंतर त्याने ट्विट केले की, मी माझे पैसे जिहादींना देऊ इच्छित नाही.
- ट्विटसोबतच त्याने कॅब बुकिंगचा स्क्रीन शॉटही पेस्ट केला होता.

 

ट्विट व्हायरल झाल्यावर लोकांनी केल्या अशा कॉमेंट्स...
- अभिषेकच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले- नक्कीच संघी इडियट, मिडिल ईस्ट देशांतून तेलाचे कॉन्ट्रॅक्टही रद्द करा, कारण तेही मुस्लिम आहेत.
- एकाने ओलाला ट्विट केले की, या सांप्रदायिक भेदभाव पसरवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा आपल्या कॅबची बुकिंग करण्याची अनुमती देऊ नका.
- त्यावर अभिषेकने एक ट्विट पुन्हा केले, ज्यात लिहिले आहे की, "जर तुम्ही मी केलेल्या कृतीशी सहमत असाल तर RT करा, जेव्हा ते भगवान हनुमानाचे रुद्र रूप पाहून @Olacabs @Uber ची बुकिंग कॅन्सल करू शकतात, तर त्यांना उत्तर द्यावेच लागेल.' 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने असे ट्विट यामुळे केले, कारण बंगळुरूच्या एका महिलेने 'रुद्र हनुमानाचे पोस्टर असलेल्या कॅबमध्ये प्रवास करण्याचे आवाहन केले होते. सोबतच तिने हेही लिहिले होते की, मी रेप टेररिजमला चालना देणारे आणि बलात्काऱ्यांचे पोट भरण्यासाठी माझा पैसा देणार नाही.
- पुढे लिहिले होते की, हे माझे ट्विट त्या महिलेच्या ट्विटला प्रत्युत्तर आहे. माझ्या प्रकरणात कंपनीने जेवढ्या लवकर अॅक्शन घेतली, कंपनीने त्या महिलेवरही अॅक्शन घेतली पाहिजे होती.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, टविटरवर आलेल्या प्रतिक्रिया.. 

बातम्या आणखी आहेत...