आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 महिन्यांपूर्वीच झाले होते लव्ह मॅरेज, अॅक्सिडेंटनंतर चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागलपूर - येथे राहणाऱ्या 25 वर्षीय सागर ऊर्फ धनंजय यादव याचा शुक्रवारी संध्याकाळी भीषण अपघातात मृत्यू झाला. सूत्रांनुसार, सागरचे नुकतेच 15 डिसेंबर रोजी लग्न झाले होते. कुटुंबीय म्हणाले, तो अभ्यासात खूप हुशार होता. पदवी शिक्षणानंतर तो रेल्वे भरतीची तयारी करत होता. संध्याकाळी तो कोचिंग क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. रेल्वे ड्रायव्हरची व्हॅकन्सी निघाली होती, त्याचा फॉर्म त्याला खरेदी करायचा होता. परंतु तेवढ्यात त्याला ट्रकने चिरडल्याची माहिती मिळाली. सागरचे 15 डिसेंबर रोजी लव्ह मॅरेज झाले होते.  


संतप्त जमावाने 50 हून अधिक ट्रक ड्रायव्हरना लुटले...
- या भीषण अपघातानंतर संतप्त लोकांनी एनएच-80 चक्का जाम केला, जमावाने 50 हून अधिक ट्रकचे नुकसान केले.
- हिंसक बनलेल्या जमावाने अडकून पडलेल्या ट्रक ड्रायव्हरनाही लुटले. ट्रक ड्रायव्हर्सवर धारदार हत्यार रोखून त्यांच्याकडून रोख रक्कम तसेच मोबाइल लुटण्यात आले.
- ट्रक ड्रायव्हर अरविंद रजक म्हणाला की, साहेबगंजपासून ट्रकमध्ये माल भरून तो भागलपूरला जात होता.
- जाम लागल्याने राजपुर वळणाजवळ ट्रक उभा केला तेव्हा 8-10 उपद्रवींनी धारदार हत्यार, रॉड, कत्तीने हल्ला चढवला. मग मोबाइल आणि 1000 रुपये रोख हिसकावून घेऊन गेले.
- मुजफ्फरपुरचा ट्रक ड्रायव्हर प्रमोद राय, संजय राय यांच्याकडून रोख व मोबाइल लुटण्यात आले. तथापि, लुटपाट झाल्याची माहिती मिळताच डीएसपी शहरयार अख्तर यांच्या नेतृत्वाखाली उपद्रवी आंदोलकांना पोलिसांनी पिटाळून लावले.

 

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 5 बंबांनी केली प्रयत्नांची शर्थ

- मृत्यूनंतर संतप्त झालेल्या जमावाने 10 ट्रकांना आग लावली. आगीच्या ज्वाळांनी शेजारच्या एका झोपडीलाही कवेत घेतले.
- तब्बल 1 तासानंतर फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहोचली. आग एवढी भीषण होती की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 5 टँकरमधील पाणीही कमी पडले.

 

जर्जर झालेल्या रस्त्यावरील अपघाताने संतप्त झाले लोक...
झीरोमाइलपासून कहलगांवपर्यंत 30 किलोमीटरच्या जर्जर झालेल्या राष्ट्रीय महामार्ग 80 मुळेच लोकांमध्ये प्रचंड राग दिसला. अनेक वेळा कलेक्टरना दुरवस्थेसंबंधी निवेदन देऊनही काहीच होत नसल्याने सागरच्या मृत्यूनंतर लोकांचा संताप उफाळून आला. हा अपघातही खराब रस्त्यामुळेच घडला.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...