आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीला बंधक बनवून तीन दिवस Rape, नकार दिल्याने डोक्यात डंबेल्स घालून केला Murder

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येथे एका सिक्युरिटी गार्डने तरुणीची डोक्यात डंबेल्स घालून हत्या केली. आरोपीने तीन दिवस बंधक बनवून या तरुणीवर बलात्कार केला. चौथ्या दिवशी तिने नकार दिला तेव्हा त्याने तिची हत्या केली. आरोपीच्या पत्नीनेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला. आरोपीने हत्या करण्यासाठी तरुणीच्या डोक्यावर डंबेल्सने 15-20 वार केले. 


आरोपीचे नाव रामवीर (50) आहे. तो अनेक दिवसांपासून पत्नीपासून विभक्त होता, पण ते आसपासच राहत होते. त्याची पत्नी 20 वर्षाच्या त्यांच्या मुलाबरोबर राहत होती. आरोपी रामवीरने चार पाच दिवसापूर्वी मृत तरुणीला तो काम करत असलेल्या ईस्ट ऑफ कैलाश येथून आणले होते. संगम विहार येथील त्याच्या घरी त्याने तिला ठेवले होते. लोकांना वाटले की ती त्याची मुलगी असेल. पण नंतर लोकांना कळले की तो तिच्याशी लग्न करण्याचा विचार करत होता. 


तीन दिवस रेप नंतर हत्या 
तपासात समोर आले की, रामवीरने तरुणीला चार पाच दिवसांपूर्वी घरी आणले होते. एका ठिकाणी ही तरुणी त्याला भेटली. त्याने तिला नोकरी लावण्याच्या बहाण्याने घरी आणले. त्याने तिला सांगितले होते की, तुला नोकरी लावून देतो आणि तुझ्याशी लग्नही करतो. तरुणीला घरी आणल्यानंतर तीन दिवस आरोपीने तरुणीवर बलात्कार केला. चौथ्या दिवशीही तो तिच्यावर बळजबरी करत होता, पण तिने त्याला विरोध केला. यावेळी तरुणीने त्याला सांगितले की माझा एक मित्र असून मी तुझ्याशी नव्हे तर त्याच्याशी लग्न करणार आहे. त्यामुळे नाराज झालेल्या रामवीरने रागात तिची हत्या केली. त्याने जवळपास डंबेल्सने 15-20 वार तिच्या डोक्यावर केले. 


तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी रामवीर जवळच राहत असलेल्या त्याच्या बायकोकडे गेला होता. त्याने बायकोला तरुणीची हत्या केल्याबाबत सांगितले. त्यानंतर त्याच्या पत्नीने 100 नंबरवर फोन लावला आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिस घरी गेले तेव्हा आरोपी त्या मृतदेहाजवळच होता. मृतदेहाची अवस्था पाहता आरोपीने तरुणीला मारल्यानंतर तिच्या मृतदेहावरही बलात्कार केला असावा असा संशय पोलिसांना आहे. 

बातम्या आणखी आहेत...