आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी बाहेर जाताच भटक्या कुत्र्यांना पकडून घरी आणायचा पती, पोलखोल होताच समोर आले पाशवी कृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क/ कोलकाता - पश्चिम बंगाल पोलिसांनी एका 35 वर्षीय पुरुषाला भटक्या कुत्र्यांसोबत अनैसर्गिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी कमलेश महतो हा कागद निर्मिती कारखान्यात रोजंदारी कामगार असून तो स्टाफ क्वार्टरमध्ये राहतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी कमलेशने त्याची पत्नी पत्नी आणि 3 मुले बिहारमध्ये एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले तेव्हा हे कुकृत्य केले. आरोपीने कबूल केले की, जेव्हा केव्हा त्याचे कुटुंब बाहेर असायचे, तेव्हा तो नेहमी एखाद्या भटक्या कुत्र्याला आपल्या रूममध्ये ओढून आणायचा आणि त्याच्यासोबत कुकर्म करायचा.

 

या घटनेचे 3 साक्षीदारही आहेत. साक्षीदार म्हणाले की, आरोपी भटक्या कुत्र्यांना ओढून फॅक्टरीमध्ये असलेल्या घरात घेऊन यायचा. काही जणांनी पाठलाग केल्यावर कमलेश कुत्र्याला तेथेच सोडून पळून आला. त्या युवकांनी कुत्र्यांना व्हेटरनरी हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्याच्यावर कुकर्म झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध आयपीसीचे कलम 377 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.


काय आहे कलम 377?
या कलमानुसार अनैसर्गिक लैंगिक संबंधांना बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. जर एखादी स्‍त्री-पुरुष परस्पर सहमतीनेही अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करतात, तर या कलमानुसार 10 वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. एखाद्या प्राण्याशी लैंगिक संबंध बनवल्यास हे कलम लागू होते. म्हणजेच याप्रकरणी दोष सिद्ध झाल्यावर आरोपीला 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. सहमतीने दोन पुरुषांना वा दोन महिलांमधील लैँगिक संबंधही या कायद्यानुसार गुन्हा आहेत. गे मॅरेज समर्थकांनी या कलमाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. त्यावरच सध्या सुनावणी सुरू आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...