आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPS अधिकारी पत्नीशी बळजबरी संबंध ठेवत असल्याचा पतीचा आरोप, पुरावा म्हणून व्हायरल केली अश्लील \'सेक्स टेप\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकच्या बंगळुरूत IPS अधिकाऱ्याची एका विवाहित महिलेसोबतची सेक्स टेप व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. महिलेच्या पतीचा आरोप आहे की, बंगळुरू (ग्रामीण) एसपी भीमशंकर एस. गुलेड यांनी त्याच्या पत्नीसोबत बळजबरी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. याचा पुरावा म्हणून त्याने ही अश्लील सेक्स टेप व्हायरल केली.

 

असे आहे प्रकरण...
देवनागरे येथील रहिवासी 40 वर्षीय पतीने सांगितले की, त्याला व त्याच्या पत्नीला एसपीने जिवे मारण्याची धमकी देत आहे. पीडित पती म्हणाला की, त्याची पत्नी सध्या बेपत्ता आहे. 5 जुलैला कोरमंगला पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याच्या रूपात पतीची तक्रार नोंदवली. दुसरीकडे, पोलिस म्हणतात की, आम्ही एफआयआर नोंदवण्याआधी कायदेशीर सल्ला घेत आहोत.

 

एसपीने पत्नीशी बळजबरी बनवले संबंध

आपल्या तक्रारीत पतीने गुलेडवर आरोप ठेवलाय की, तो 2016 ते 2018 दरम्यान देवनागरे जिल्ह्याचा एसपी होता. आणि ऑक्टोबर 2016 मध्ये त्याच्या पत्नीच्या संपर्कात आला. पतीने सांगितले की, मी माझ्या पत्नीसाठी देवनागरेमध्ये एक फोटोग्राफी स्टूडियो सेटअप केला होता. एसपी आमचा पहिला ग्राहक होता आणि त्याने माझ्या पत्नीला त्याच्या जुळ्या मुलींचा बर्थ डे शूट करण्यासाठी सांगितले होते. यानंतर त्याने माझ्या पत्नीवर दबाव बनवणे सुरू केले आणि लैंगिक संबंधासाठी सांगू लागला.' 

 

पत्नी म्हणाली - पतीशी झाले भांडण
तो पुढे म्हणाला की, 'माझी पत्नी भीतीमुळे गप्प राहिली आणि एसपीने तिचा अनेकदा फायदा उचलला.' तथापि, पतीचा पत्नी बेपत्ता असल्याचा दावा असला तरी, त्याच्या पत्नीने एका न्यूज चॅनलला सांगितले की, तिचे पतीशी भांडण झाले होते. पतीने तिला आणि एसपीला बदनाम करण्यासाठी फेक व्हिडिओ बनवले आहेत.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या व्हायरल व्हिडिओतील काही Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...