आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या वाढदिवशी पत्नीने दिली गुलाबाची फुले, तर पतीने खाऊ घातले विषारी चॉकलेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर (झारखंड) - येथील बिरसानगरात सोमवारी रात्री व्यवसायाने ठेकेदार 39 वर्षीय निशांत वैभवने आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने आपली पत्नी पूर्णिमा (34) आणि एकुलता एक मुलगा अक्षत राज (6) यांना चॉकलेटमध्ये विष मिसळून खाऊ घातले. मंगळवारी निशांतच्या लग्नाचा सातवा वाढदिवस होता. यासाठी सोमवारी संध्याकाळी पूर्णिमा तिचा पती निशांतला देण्यासाठी 7 गुलाबांचा एक पुष्पगुच्छ घेऊन गेली होती. तिने तो फ्रीजमध्ये ठेवला होता. याशिवाय एक फुलांचा हारही दिला होता.

 

खोलीत आई गेली असता बेडवर दिसले सून-नातू, पंख्याला लटकला होता मुलगा
निशांतने आत्महत्या करण्याआधी सर्व प्लॅनिंग केली होती. सकाळी दार उघडले असता दाराची कडी लावलेली नव्हती. दाराच्या मागे सोफा लावला होता. निशांतची आई म्हणाली की, मी सकाळी नातवाला जागे करण्यासाठी गेले, खोलीचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. दारामागे सोफा असल्याने दार उघडले नाही. दार जोरात लोटून आत गेले तेव्हा बेडवर सून आणि नातू पडलेले दिसले. दुसऱ्या रूममध्ये निशांत पंख्याला लटकलेला होता. हे पाहून माझे श्वास अडकले.

 

मृत्यूच्या वेळीही दिसले आईचे वात्सल्य

आई आणि मुलाचे मृतदेह एकाच रूममध्ये आढळले. दोघांचा चेहरा एकमेकाकडे वळलेला होता. मृत्यूच्या वेळीही आईच्या डोळ्यात मुलासाठी वात्सल्य दिसले. जसे काही दोघेही एकमेकांना न्याहाळत आहेत. मृतदेहांना असे पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. निशांतचा एकुलता एक 6 वर्षांचा मुलगा अक्षत राज ऊर्फ अकी शाळेत यूकेजीमध्ये शिकत होता. मुलाजवळ खेळण्यातली एक कार ठेवलेली होती. आईकडे अर्धे खाल्लेले विषारी चॉकलेट पडलेले होते. फरशीवर मुलाची खेळणी होती. घरचे म्हणाले की, अक्षतने खेळता-खेळता चॉकलेट खाल्ले आणि जे झोपला तो पुन्हा उठलाच नाही.

 

सकाळी ईएसआय हॉस्पिटलमध्ये गेला होता निशांत
मृतदेह फ्लॅटमधून नेताना सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. त्याच फ्लोअरवर दुसऱ्या फ्लॅटमध्ये मांतारामणी देवी आणि वडील एन.के. सिंह राहतात. एन.के. सिंह म्हणाले की, सोमवारी सकाळी ईएसआय हॉस्पिटलमध्ये गेलेला निशांत संध्याकाळी उशिरा परतला. निशांत ईएसआय हॉस्पिटलमध्ये कँटीन चालवायचा. मंगळवारी सकाळी ते दूध घेण्यासाठी बाहेर गेले होते. यादरम्यान त्यांचा मोठा मुलगा जो दुसऱ्या ब्लॉकमध्ये राहतो तो तेथे पोहोचला आणि त्याने निशांतने आत्महत्या केल्याचे सांगितले.

 

सुसाइड नोटमध्ये व्यवसाय परवडत नसल्याचा उल्लेख
ठेकेदार निशांतने आईवडील आणि मोठ्या भावासाठी दोन वेगवेगळ्या सुसाइड नोट लिहिल्या आहेत. आईवडिलांची माफी मागत त्याने कँटीनचा व्यवसाय परवडत नसल्याचा उल्लेख केला आहे.

 

आई-वडिलांना लिहिलेल्या पत्रात निशांतने म्हटले...
आदरणीय, मम्मी-पप्पा! मला माफ करा. मी आतून मोडून पडलो आहे. माझ्या परिस्थितीमुळे तुम्हाला मम्मी आणि मुन्नी, सर्वांना खूप त्रास होत होता, खूप ऐकून घ्यावे लागत होते. मी जिवंत असून नसल्यासारखा झालो होतो. कोणत्याच गोष्टीत मन लागत नव्हते. एक-एक दिवस काढणे कठीण झाले होते. कंपनीचा कोणताही कर्मचारी आला, तर त्यांना सांगा की, प्रमोद कुमार सिंह बिल क्लिअर करेल, त्याच्याशी बोला. प्रमोद, 60 टक्के पेटीमध्ये त्यांचा आजपर्यंतचा जो पैसा बाकी आहे, तो केपीओच्या बिलातून क्लिअर होईल. टीजीएल जमशेदपूर क्लिअर करेल. त्यात 60 टक्के ते टाकतील, मी चेकबुक्सवर साइन केलेले आहेत.

 

भय्या, माझ्याकडून काही चुकले असेल तर माफ कर
भय्या! सादर प्रणाम, आता तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे. असे आईवडील खूप नशिबाने मिळतात. त्यांची काळजी घे. जर माझ्याकडून काही चुकले असेल, तर माफ कर.

 

दुसऱ्या पत्रात निशांतने लिहिले...
मी माझ्या मृत्यूची जबाबदारी घेतो. मी कुणाच्या सांगण्यावरून वा दबावात येऊन हे पाऊल उचलत नाहीये. माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य यासाठी जबाबदार नाहीये. जिथपर्यंत माझ्या कंपनीची गोष्ट आहे. याची पूर्ण मालकी माझी आहे. आतापर्यंत कंपनीत जे काही झाले त्याची जबाबदारी माझी होती. कंपनीत जो नफा, जो घाटा आणि जे कर्ज होते ते सर्व माझे होते. मी गेल्यानंतर माझ्या कुटुंबातील कोणालाही त्रास देऊ नये...
...तुमचा निशांत वैभव

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचे आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...