आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Manglur Pub Attack: 20 People Including Shriram Senas Mutalik Were Innocent

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळूर पब हल्ला: श्रीराम सेनेचे मुतालिक यांच्‍यासह 20 जण निर्दोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकातील मंगळुरात २४ जानेवारी २००९ रोजी पबवर हल्ला करून मुला-मुलींना मारहाणीच्या आरोपातून कोर्टाने श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिकसह ३० जणांची निर्दोष सुटका केली. ज्या लोकांची सुटका करण्यात आली त्यातील बहुतांश आरोपी अजूनही तुरुंगातच होते.

 

निकाल जाहीर होताच प्रमोद मुतालिक यांनी हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले आहे. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आरोप सिद्ध करण्याइतपत सबळ नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.