आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Married Woman Committed Suicide Just Before Marriage Of Brother In Law In Jodhpur

संध्याकाळी निघणार होते दिराच्या लग्नाचे वऱ्हाड, भावजयीने दुपारीच केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर (राजस्थान) - मंडोर माता मंदिर परिसरात शुक्रवारी एका घरातील लग्नाचा आनंद आत्महत्येच्या घटनेमुळे दु:खात बदलला. दिराच्या लग्नाचे वऱ्हाड रवाना होण्याच्या काही तासांपूर्वीच त्याच्या भावजयीने गळफास लावून आत्महत्या केली. मृत महिला पती व मुलांसोबत वेगळी राहत होती. घटनेच्या आधी भावजयीने दिराचे लग्नापूर्वीचे काही विधीही पार पाडले होते.

 

मंडोर पोलिस म्हणाले की, माता मंदिर परिसरातील रहिवासी पूजा माली (24) हिने शुक्रवारी दुपारी आपल्या रूमच्या व्हेंटिलेटरला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या दिराचे वऱ्हाड संध्याकाळी रवाना होणार होते. लग्नकार्यामुळे घरी नातेवाइकांची रेलचेल होती. परंतु आत्महत्येची माहिती मिळताच तेथे मोठा गोंधळ माजला. कुटुंबीयांनी तिच्या रूमचे दार तोडून पूजाला फासावरून उतरवले आणि ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवले. परंतु तेथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

 

पती आणि मुलांसोबत वेगळी राहत होती... 
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, मृत पूजा आपल्या पती व मुलांसोबत वेगळी राहत होती. तिच्या दिराच्या लग्नापूर्वी शुक्रवारी सकाळी तूप पाजण्याचा प्रथा पार पाडण्यात आली. यानंतर ती कपडे बदलण्यासाठी स्वत:च्या घरी गेली. परंतु खूप वेळ होऊनही बाहेर आली नाही, म्हणून तिला बोलवण्यासाठी नातेवाईक भैरूसिंह तेथे गेला. तेव्हा घराचे दार बंद आढळले. शेजारच्या घराच्या छतावर जाऊन पाहिल्यावर पूजा फासावर लटकलेली आढळली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...