आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking: फेसबुकवरील प्रेमाखातर तिने 2 लाख पगार असलेला पती अन् 2 मुलांना दिली सोडचिठ्ठी Married Woman Love On Facebook

Shocking: 8 हजार पगाराच्या Boyfriend साठी पत्नीने सोडला 2 लाख पगाराचा प्राध्यापक पती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जहानाबाद (बिहार) - मध्यप्रदेशातील रिवा जिल्ह्यातील एका कॉलेजच्या बायोलॉजी प्रोफेसरच्या शिक्षिका पत्नीला फेसबुकवर तरुणाशी प्रेम झाले. महिला दोन मुलांची आई आहे. ती प्रेमात एवढी वाहवत गेली की, 2 लाख रुपये पगार असणारा प्राध्यापक पती सोडून सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये 8 हजार महिना कमावणाऱ्या एका तरुणावर फिदा झाली. ती पती आणि दोन मुलांसोडून गत 9 मेपासून जहानाबाद (बिहार) मध्ये प्रियकरासोबत लग्न थाटून राहत होती. पत्नी गायब झाल्यानंतर पतीने स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली होती.  

 

पोलिसांनीही केला समजावण्याचा प्रयत्न
- रिवाच्या मोबाइल टॉवर लोकेशनच्या आधारे तिचा पती पोलिसांसोबत मंगळवारी जहानाबादला पोहोचला. येथे पोहोचल्यावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला पत्नीचा शोध लागला. यानंतर पोलिसांनी महिलेला पोलिस स्टेशनला बोलावले.
- मग पती आणि पोलिसांनी तिची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु फेसबुकवरील प्रेमात ती एवढी बुडाली होती की, काहीही ऐकून घ्यायचे नव्हते. ती प्रियकराला कोणत्याही परिस्थितीत सोडून देण्यासाठी तयार नव्हती.

 

प्रौढ असल्याने पोलिसांनी केली नाही बळजबरी
- शेवटी पोलिसांनी प्रौढ असल्याने तिला बळजबरी करायला नकार दिला. आणि ती प्रियकरासोबत त्याच्या घरी निघून गेली. प्राध्यापकांने दोन मुलांच्या शपथा घालून पत्नीला घेऊन जाण्यासाठी खूप विनवणी केली, परंतु तिने प्रत्येक गोष्ट कानानिराळी टाकली. प्राध्यापकही निराश होऊन रिकाम्या हाताने घरी परतण्यास मजबूर झाला.

 

2002 मध्ये श्वेताशी झाले होते प्राध्यापकाचे लग्न 
- प्राध्यापक म्हणाले, 2002 मध्ये त्यांचे लग्न श्वेताशी झाले होते. त्यांनीच तिचे शिक्षण पूर्ण करून तिला शिक्षिकेची नोकरीही लावून दिली. तिच्यासोबत आनंदी जीवन जगत होते.
- यादरम्यान काही महिन्यांपूर्वीच तिची फेसबुकवर जहानाबादच्या किरायाच्या खोलीत राहणाऱ्या कुंदन कुमारशी ओळख झाली.

 

फेसबुकवर संपर्क झाल्यावर दोघांत फुलत गेले प्रेम
- फेसबुकवर प्रेम झाल्यानतर दोघांमध्ये सातत्याने चॅटिंग होऊ लागली आणि फोनवरही दोघेही एकमेकांशी बातचीत करत राहिले.
- शेवटी फेसबुकच्या चक्करमध्ये पडून ती आपल्या दोन मुलांना सोडून गेली. अन् प्रोफेसरच्या कुटुंबाची राखरांगोळी झाली. या अनोख्या प्रेमकहाणीबाबत ऐकणारे सर्वच सुन्न झाले.  

 

 

बातम्या आणखी आहेत...