आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Married Women Cheats Her Husband For Lover But Husband Forgive Her With A Lesson

एक पती असाही: प्रियकरासाठी तिने पती अन् 8 महिन्यांची मुलगी टाकली, प्रियकराने नकार दिल्यावर पतीनेच दिला आश्रय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - "माझ्याकडून मोठी चूक झाली आहे, माझे मोडलेले लग्न पुन्हा जोडून द्या, माझे हे तिसरे लग्न आहे, माझ्या प्रियकराने अन् आईवडिलांनी मला स्वीकारायला नकार दिला. माझ्याजवळ राहण्याची आता कोणतीही जागा नाही. 10 दिवसांपूर्वीच माझा घटस्फोट झाला. मला 8 महिन्यांची मुलगी आहे, जी माझ्या पतीकडे आहे. मला मुलगी अन् पतीसोबत पुन्हा राहायचे आहे," असे म्हणत एका विवाहितेने महिला हेल्पलाइनवर मदत मागितली. समुपदेशकांनी तिच्या बाळाचे वय पाहून दुसऱ्याच दिवशी तिच्या पतीला संपर्क साधला. त्यांच्या समुपदेशनामुळे पती आपल्या धोकेबाज पत्नीला सांभाळायला पुन्हा तयार झाला.

 

लग्नाच्या 2 महिन्यांनी झाला घटस्फोट, 8 महिन्यांनी पुन्हा झाले प्रेम...
- पंचमहल जिल्ह्यातील 25 वर्षीय काव्या (बदललेले नाव)  20 वर्षांची असताना तिच्या आईवडिलांनी ज्या तरुणाशी तिचे लग्न लावले होते, तिने त्याच्यापासून 2 महिन्यांतच घटस्फोट घेतला. यानंतर 8 महिन्यांनी ती रोहितच्या प्रेमात पडली आणि पळून जाऊन तिने संसार थाटला. 

- रोहित संयुक्त कुटुंबात राहायचा, यामुळे काव्याला संयुक्त कुटुंबात राहणे आवडत नव्हते. ती वेगळी राहू लागली. वेगळी राहून काव्या घरातील काम करत नव्हती, दिवसभर बाहेर हिंडणे-फिरणे तिला आवडायचे. यामुळे रोहित आणि काव्याचा घटस्फोट झाला. यानंतर काव्या माहेरी येऊन राहू लागली.

 

तिसऱ्यांदा झाले प्रेम, तर आईवडिलांनीही सोडली साथ
- माहेरची आर्थिक स्थिती बिकट असल्याने ती घरी शिवणकाम करत होती. दरम्यान, मेहुल नावाच्या एका व्यापाऱ्याच्या घरी शिवणकामाचे मटेरियल घ्यायला जायची. यादरम्यान, मेहुल अन् काव्यामध्ये जवळीक वाढली. प्रेमात पडल्यानंतर 2 वर्षांपूर्वीच दोघांनी केले लग्न केले. 8 महिन्यांपूर्वीच ते एका मुलीचे आईबाप बनले. दरम्यान, काव्या तिच्या सोसायटीच्या मागे राहणाऱ्या भावेशसोबत अवैध संबंध ठेवू लागली. यामुळे त्रस्त होऊन पती मेहुलने काव्याला घटस्फोट दिला.
- यानंतर मेहुलने लहान मुलगी स्वत:कडे ठेवली. तिचा नवा प्रियकर भावेश म्हणाला की, मी बायकोला घटस्फोट दिल्यावर तुझ्याशी लग्न करीन. दरम्यान, काव्याच जेव्हा भावेशजवळ राहायला गेली, तेव्हा त्याने आपल्या पत्नीला सोडायला नकार दिला.
- या सर्व प्रकारामुळे काव्याच्या आईवडिलांनीही तिला सांभाळायला नकार दिला. शेवटी काव्याने महिला हेल्पलाइन 181 वर कॉल करून मदतीची याचना केली.

- समुपदेशक शीतल बेन यांनी काव्याचा पती मेहुल याची समजूत घातली. काव्याकडून लिहून घेतले की, ती पुन्हा असे वागणार नाही. लेखी शपथपत्र दिल्यानंतर मेहुलने दुसऱ्याच दिवशी काव्याला पुन्हा स्वीकारले. या सर्व प्रकारात त्यांच्या 8 महिन्यांच्या चिमुरड्या मुलीची मात्र विनाकारण फरपट झाली.
(टीप: या वृत्तातील सर्व नावे बदललेली आहेत.)

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos..   

बातम्या आणखी आहेत...