आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेने घेतली फाशी, चिठ्ठीत लिहिले-पतीचे प्रेम पैशावरच , दादा त्याला सोडू नको

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीकर/खाटूश्यामजी - एका विवाहितने लग्नाच्या 14 महिन्यांनंतरच फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. फाशी घेण्यापूर्वी आईला मृत महिलेने सुसाइड नोट व्हाट्स अॅप केले. नातेवाईकांनी पतीसह चार जणांवर हत्येचा आरोप करत आंदोलन केले. पोस्ट मॉर्टर्मनंतर आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. नंतर अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेतला. नंतर ते सासरच्या लोकांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


असे होते प्रकरण.. 
मृत ज्योती शर्मा (26 वर्षे) हिचे लग्न गुलशन कुमारशी झालेले होते. ज्योतीचा भाऊ मनोज शर्मा याने सांगितले की, त्याच्या आईला बहिणीचा फोन आला होता. सासरचे लोक तिला मारहाण करत असल्याचे तिने सांगितले होते. हत्या करण्याची शक्यताही वर्तवली होती. मृत महिलेच्या आईने सांगितले की, ज्योती त्यांना त्रास होत असल्याचे सांगत होती, पण ते तिला समजावून शांत करण्याचा प्रयत्न करत असायचे. 


पती गुलशन भजन गायक 
शुक्रवारी ज्योतीचा मॅसेज तिच्या कुटुंबीयांना मिळाला तर ते घाबरून गेले. ज्योतीला त्यांनी अनेकदा फोन केले पण तिने उचलला नाही. तिचा नवरा गुलशनला फोन केला तर आधी त्यानेही फोन उचलला नाही आणि नंतर भांडणाबाबत विचारले तर काहीही सांगितले नाही. मॅसेजबाबत सांगितले तेव्हा तो खोलीकडे गेला. तर खोली आतून लावलेली होती. त्यानंतर दार तोडण्याचा आवाज आला फोन बंद झाला. 

पोलिसांनी मृत महिला ज्योतीचा भाऊ मनोजच्या तक्रारीवरून पती गुलशन कुमार, सासू नीलम देवी, नणंद बरखा आणि श्रुती कुमारी यांच्या विरोधात 498अ, 304 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


20 लाख आधीच दिले होते, घर विकून केले होते लग्न 
मनोजने सांगितले की, 28 फेब्रुवारी 2017 ला गुलशन आणि त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते. गुलशन भजन गायक आहे. लग्नानंतर नेहमी तो पत्नीला मारहाण करून पैशाची मागणी करायचा. ज्योतीचे वडील अर्धांगवायू झाल्याने अंथरुणाला खिळून आहेत तर आईला कॅन्सर आहे. जयपूरमधील जुने घर विकून त्याने बहिणीचे लग्न केले होते. आतापर्यंत तिच्या सासरच्या लोकांना 20 लाख रुपये दिले असल्याचे त्याने सांगितले. 

 

पुढे पाहा, विवाहितेची सुसाइड नोट...

बातम्या आणखी आहेत...