आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मारुति सुझुकीच्या एसयूव्ही सेगमेंटच्या विक्रीत यावर्षी 29.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, सन 2017-18 मध्ये विटारा ब्रिझा, एर्टिगा, एस क्रॉससहित यूटिलिटी व्हेइकल्सची 253,759 युनिट विक्री झाली आहे. एसयूव्हीमध्ये वाढीसह मारुतीचा फोकस स्मॉल कार्समध्येही आहे. वृत्तानुसार, मारुती सुझुकी लपकरच भारतीय ऑटोमोबाइल बाजारात आपले सर्वात लोकप्रिय मॉडेल Altoला नव्या अवतारात लाँच करणार आहे.
हे मॉडेल पहिल्यापेक्षा पॉवरफुल आणि चांगले मायलेज देणारे असेल. सन 2019 मध्ये ही लॉन्च केली जाऊ शकते. तथापि, याच्या लॉन्चिंगबाबत जेव्हा मारुती सुझुकीच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन मॅनेजर नीरजा भरत यांना विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या की, सध्याच काही सांगता येणार नाही. तथापि, जुन्या अल्टोच्या तुलनेत न्यू जनरेशन जास्त मोठी, स्पेशियस आणि पावरफुल असेल. यासोबतच कंपनीने या कारला आणखी जास्त फ्यूएल इफिशियंट बनवले आहे.
नव्या अल्टोमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑप्शनल AMT
वृत्तानुसार, न्यू जनरेशन अल्टोमध्ये कंपनीने 658cc चे इंजिन लावण्यात आले आहे, जे 53bhp पॉवर जनरेट करते, दुसरीकडे याचे टर्बो इंजिन 62bhp पॉवर जनरेट करेल. नव्या अल्टोमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑप्शनल AMT देण्यात आले आहे. कारला इकोनॉमी ठेवण्याबरोबरच तिच्या सेफ्टी फीचर्सवरही पूर्ण लक्ष देण्यात आले आहे.
2.6 लाखांत मिळेल 32 km/l मायलेज!
न्यू जनरेशन अल्टोमध्ये ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम) सोबतच ड्युएल एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. तथापि, बेस मॉडेलसाठी या कारची किंमत 2.6 लाख रुपये आणि टॉप एंडसाठी 3.8 लाख रुपये एक्स्पेक्ट केली जात आहे. फ्यूएल इफिशियन्सीमध्ये कार खूप पुढे नाही आणि 32 km/l चे मायलेज देईल. कंपनी ही कार भारतात 2019 पर्यंत लाँच करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फीचर्स
- AC, पॉवर स्टिअरिंग, पॉवर विंडो
- सेंट्रल लॉकिंग, फॅब्रिक सीट
- 4 स्पीकर्ससोबत स्टिरिओ सिस्टिम
- ऑप्शनल एअरबॅग्ज आणि ऑप्शनल AMT
पुढच्या स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आणखी फोटोज...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.