आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैदराबाद / नवी दिल्ली- अयोध्या वादावर न्यायालयाच्या बाहेर तोडगा काढण्याचा पर्याय देणाऱ्या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे कार्यकारी सदस्य मौलाना सलमान नदवी यांची बोर्डाने हकालपट्टी केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी श्री श्री रविशंकर यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर वादग्रस्त भूमीवर मंदिर बांधण्यास सहमती दर्शवली होती. तसेच मशिदीसाठी दुप्पट जमीन देण्यात यावी आणि मुस्लिमांसाठी विद्यापीठ सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या या निर्णयावरून बोर्डाचे सदस्य नाराज होते. बोर्डाच्या वार्षिक बैठकीनंतर प्रवक्ता कासीम इलियास यांनी रविवारी सांगितले, बाबरी मशीद इस्लाममध्ये विश्वासाचा अतूट भाग आहे. मुस्लिम मशीद कधीच सोडू शकत नाहीत. ती पाडल्यामुळे तिची ओळख पुसली जात नाही. कयामतपर्यंत ती मशीदच राहील. मशिदीची जमीन कोणालाही विकता किंवा हस्तांतरित करता येत नाही अथवा भेट म्हणूनही देता येत नाही. बोर्डाच्या या भूमिकेवर कोणतीही तडजोड होणार नाही. याविरोधात गेल्यामुळे मौलाना नदवी यांना काढून टाकण्यात आले आहे.
बोर्डाने असेही म्हटले, बाबरी मशीद पुन्हा बांधण्यासाठी संघर्ष सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयात जो खटला सुरू आहे, तो बोर्ड संपूर्ण ताकदीनिशी लढेल. तेव्हा नदवी बैठक अर्धवट सोडून निघून गेले.
मौलाना सलमान नदवी म्हणाले, संघटनेत काही लोक चुकीचा निर्णय घेत आहेत. मी हिंदू अथवा मुस्लिमांत भांडणे लावणाऱ्यांसोबत नाही. आम्ही पुढेही श्री श्री रविशंकर यांची भेट घेऊ. साधू-संतांच्या साह्याने शांततेचा नवा मार्ग काढू.
मुस्लिम बोर्ड दहशतवाद्यांची शाखा : वसीम रिझवी
शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी माध्यमांशी बोलताना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डावर अनेक गंभीर आरोप केले. रिझवी म्हणाले, पर्सनल लॉ बोर्ड बरखास्त करण्यात यावे. ही संस्था देशातील वातावरण बिघडवत आहे. मुस्लिम बोर्ड ही दहशतवाद्यांची एक शाखा असल्याचा आरोप रिझवी यांनी केला.
- मौलाना सलमान नदवी यांची बोर्डातून हकालपट्टी धक्कादायक आहे. बोर्डाच्या अनेक सदस्यांनी माझी भेट घेऊन हा मुद्दा शांततेच्या मार्गाने काढण्यावर सहमती दर्शवली होती.
-श्री श्री रविशंकर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.