आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील पराभवातून मायावती काहीही न शिकल्याने त्यांनी आगामी कर्नाटक निवडणुकीत जनता दल (धर्मनिरपेक्ष) सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर त्यांचे राजकारण म्हणजे जागांसाठी ‘तडजोड’ आहे, असा आरोप काँग्रेसने रविवारी केला.
बहुजन समाज पक्ष व जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी कर्नाटक निवडणूक एकत्रित लढवणार असल्याचे जाहीर केले होते. २०१९ ची लोकसभा निवडणूकदेखील दोन्ही पक्ष एकत्र लढवतील, असे जाहीर करण्यात आले. बसपचे नेते सतीशचंद्र मिश्रा व जदयूचे दानिश अली यांनी याबाबतची घोषणा गेल्या आठवड्यात केली होती. जागांसाठी तडजोड करण्याचे मायावतींचे राजकारण असते, असे मला वाटते, असा दावा काँग्रेस नेते एम.व्ही. राजीव गौडा यांनी केला आहे.
विरोधी पक्ष पंगू बनलेल्या स्थितीत आहे. अशा वेळी मायावती यांनी आघाडी करण्यापूर्वी दोन वेळा धडा गिरवला आहे. परंतु त्यातून मायावती काही शिकल्या नाहीत. कर्नाटकात काँग्रेसला तिरंगी लढतीला सामोरे जावे लागणार आहे.
काँग्रेसचे नेतृत्व विरोधी पक्षांना मान्य
कर्नाटक निवडणुकीसाठी विरोधी पक्षांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपसारख्या जातीयवादी पक्षाचा पराभव करण्यासाठी हा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
नवीन कल्पना, धोरण, वास्तवावर काम
गौडा हे काँग्रेस पक्षाच्या संशोधन विभागाचे प्रमुख आहेत. पक्षाच्या संशोधन विभागाचे ते प्रमुख असल्याच्या नात्याने नवीन कल्पना, धोरणे व वास्तवावर काम करण्यावर भर दिला जात आहे. आमची टीम काँग्रेसच्या संसदीय समितीला राज्यातील जनतेच्या नेमक्या समस्यांची माहिती देईल. त्यामुळे जनतेला न्याय मिळू शकेल, असा विश्वासही गौडा यांनी व्यक्त केला.
‘मध्य प्रदेशात गुन्हेगारी, भ्रष्टाचार बोकाळला’
बसप प्रमुख मायावती यांनी मध्य प्रदेश राज्यातील शिवराज सिंह चौहान सरकारवर जोरदार टीका केली आहे. मध्य प्रदेशातील गुन्हेगारी वाढत चालली आहे. सरकारचे त्यावर नियंत्रण नाही. त्याचबरोबर चौहान सरकारच्या काळात राज्यात भ्रष्टाचार देखील प्रचंड वाढला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. मध्य प्रदेशातील सरकारने दुर्बल घटकांच्या विरोधात आक्रमक असे धोरण स्वीकारलेले आहे. त्यात मुस्लिम समुदायाच्या विरोधात सरकारची वागणूक तशी दिसून येते. रविवारी मायावती यांनी मध्य प्रदेशातील नेत्यांसोबत एक बैठक घेतली. त्यात त्यांनी पक्षाचे संघटन मध्य प्रदेशात बळकट करण्याचे आवाहन केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याची सूचना त्यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.