आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करोडपती कुटुंबातील डॉक्टर मुलीने सांसारिक सुखांचा केला त्याग, बनल्या जैन साध्वी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क, मुंबई - करोड़पती बिझनेस फॅमिलीतील मुंबईतील डॉ. हिना हिंगडने बुधवारी सर्व सांसारिक सुखांचा त्याग करत जैन परंपरेनुसार दीक्षा ग्रहण केली. अहमदनगर युनिव्हर्सिटीतील गोल्ड मेडलिस्ट आणि MBBS टॉपर हिना मागच्या 3 वर्षांपासून प्रॅक्टिस करत होती.

हिनाने गुजरातच्या सुरतमध्ये आध्यात्मिक गुरू आचार्य विजय यशोवर्मा सुरेश्वरजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली. हिनाने दीक्षेच्या आधी आवश्यक असलेले 48 दिवसांचे ध्यान पूर्ण केले. आचार्य विजय म्हणाले, हिनाने आपल्या मागच्या जन्मात केलेल्या ध्यान आणि श्रद्धेमुळे जैन धर्माची दीक्षा स्वीकारली आहे. डॉ. हिना आता साध्वी श्री विशारदमाला नावाने ओळखल्या जातील.

 

12 वर्षांपासून करत होत्या आई-वडिलांची मनधरणी
हीनाच्या जवळच्या नातेवाइकांनुसार, 28 वर्षीय हिना आपल्या विदयार्थिदशेपासूनच अध्यात्माकडे आकर्षित झाली होती. ती मागच्या 12 वर्षांपासून आपल्या आईवडिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना दीक्षेसाठी परवानगी घेण्यासाठी मनधरणी करत होती. यादरम्यान तिने एमबीबीएसची डिग्रीही पूर्ण केली, तीही गोल्ड मेडल पटकावून.

 

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बनल्या डॉक्टर
वडील अशोक हिंगड़ यांना हिनाला डॉक्टर झालेले पाहायचे होते. यामुळे इच्छा असूनही 12वीनंतर हीनाला दीक्षा घेता आली नव्हती. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या डॉक्टर बनल्या. आता हिना सांगतात की, त्यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे आणि वडिलांनीही त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

 

सहा बहिणींत सर्वात मोठ्या आहेत हीना 
हिनाचे कुटुंब मूळचे गुजरातमधील घाणेराव गावातील आहे. परंतु बिजनेससाठी त्यांचे आजोबा जतनराज हिंगड़ अनेक वर्षांपूर्वी मुंबईतील बोरिवलीत स्थायिक झाले होते. हिनाचे वडील अशोक हिंगड़ यांनी यार्न व्यवसाय वाढवला. हिना यांना 5 बहिणी आहेत. या सर्वांत हीना सर्वात मोठ्या आहेत. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

 

 

बातम्या आणखी आहेत...