आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्रिकरांना स्टेज 4 पॅनक्रियाटिक कॅन्सर, लिलावतीमध्ये किमोथेरपीही झाली-मीडिया रिपोर्ट्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना स्टेज 4 पॅनक्रियाटिक कॅन्सर (स्वादुपिंडाचा कर्करोग) असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये तसा दावा करण्यात येत आहे. हॉस्पिटलमधील काही सुत्रांनी दिलेल्या माहितीवरून या बातम्या देण्यात आल्यात. पर्रिकर यांनी अमेरिकेला जाण्यापूर्वी लिलावती रुग्णालयात उपचारासाठी किमो थेरपीही घेतली असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. 


मनोहर पर्रिकर हे गेल्या महिन्यापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेत आहेत. मुंबईच्या लिलावती रु्गणालयात त्यांनी उपचार घेतले. त्यावेळी काही स्थानिक माध्यमांनी त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून पर्रिकरांना कॅन्सर नसून स्वादुपिंडाचा आजार असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या उपचारासाठीच पर्रिकर लिलावती रुग्णालयात दाखल होते असे सांगण्यात आले. पर्रिकरांना दोन वेळा लिलावतीत दाखल करण्यात आले. पण अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना अमेरिकेला हलवण्यात आले आहे. 


अॅडव्हान्स स्टेजचा कॅन्सर..
गोव्याच्या हॉस्पिटलमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्रिकर यांचा कॅन्सर अॅडव्हान्स स्टेजपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे पर्रिकरांना गेल्या महिन्यात त्रास सुरू झाला तेव्हाच कॅन्सरबाबत समजले होते, असेही सुत्रांचे म्हणणे आहे. लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर फर्स्ट स्टेजची किमो थेरपीही करण्यात आली. 

 

पुढे वाचा, कॅन्सरची बातमी दिल्याने पत्रकारावर झाली होती कारवाई..


 

बातम्या आणखी आहेत...