आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेघालयमध्ये प्रथमच भाजप v/s काँग्रेस, नगालँडमध्ये माजी CM आधीच विजयी, दोन्ही राज्यांत मतदान सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परेन जिल्ह्याच्या जलुकीमघ्ये मतदानासाठी सकाळपासूनच लोकांची रांग लागलेली होती. - फाइल - Divya Marathi
परेन जिल्ह्याच्या जलुकीमघ्ये मतदानासाठी सकाळपासूनच लोकांची रांग लागलेली होती. - फाइल

कोहिमा/शिलाँग - मेघालय आणि नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या 60-60 जागा आहेत. नागालँड आणि मेघालयच्या 59-59 जागांवर मतदान होत आहे. यावेळी एकूण 599 उमेदवार मैदानात आहेत. मतदान प्रक्रिया सकाळी 7  वाजता सुरू झाली असून सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालेल. दुर्गम आणि डोंगरी भागांमध्ये मात्र मतदान 3 वाजेपर्यंतच असेल. मेघालयमध्ये प्रथमच भाजप आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे. मेघालय, नगालँड आणि त्रिपुरा निवडणुकांचे निकाल 3 मार्च रोजी लागतील. 


2 जागांवर मतदान का नाही 
- मेघालयच्या विल्यमनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जेएन संगमा यांचा 18 फेब्रुवारीला आयईडी ब्लास्टमध्ये मृत्यू झाला होता. 
- तर नागालँडच्या नॉर्दर्न अंगामी-2 जागेवर एनडीपीपी चीफ नेफ्यू रियो यांची मतदानापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.  


एकूण मतदार 

- मेघालय -  18.4 लाख मतदार, 3083 पोलिंग स्टेशन, 372 उमेदवार 
- नागालँड - 11.70 लाख मतदार, 2156 पोलिंग स्टेशन, 227 उमेदवार 

# मेघालय
> मेघालयमध्ये यावेळी प्रथमच भाजप आणि काँग्रेस यांच्यात टक्कर होणार आहे. राज्यात प्रत्येक निवडणुकीत अपक्ष मोठ्या संख्येने विजयी होतात. गेल्यावेळी 13 अपक्ष विजयी झाले होते. त्यांनी 27% मते मिळवली होती. यावेळी 84 अपक्ष उमेदवार मैदानात आहेत. 
> भाजप 47 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर 13 जागा प्रादेशिक पक्षांना दिल्या आहेत. तर काँग्रेस 59 आणि एनपीपी 57 जागांवर निवडणूक लढवत आहे. 
> येथे काँग्रेसचे 29 आमदार आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री मुकूल संगमा सलग 4 वेळा आमदार बनले आहेत. 


# नागालँड
> भाजपने 15 वर्षे जुनी आघाडी मोडली आहे. 
> माजी सीएम आणि एनडीपीपी नेते नेफ्यू रियो मतदानापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. ते 3 वेळा नागालँडचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...