आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहबुबा मुफ्तींची केंद्राला धमकी-पीडीपीमध्ये फूट पाडली तर अनेक सलाहुद्दीन तयार होतील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- पीडीपीच्या पाच आमदारांनी नुकतेच नेतृत्वावर प्रश्चिन्ह उपस्थित केले होते. 

- 19 जूनला भाजपने मेहबुबा सरकारचा पाठिंबा काढला होता. 


श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर पीडीपी (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी) मध्ये फूट पाडल्याचा आरोप केला. मेहबुबा म्हणाल्या, 1987 प्रमाणे जर दिल्लीने येथील (जम्मू-काश्मीर) जनतेचा मताचा अधिकार हिसकावण्याचा किंवा राजकीय फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर येथे अनेक सय्यद सलाहुद्दीन आणि यासीन मलिक जन्माला येतील. मला वाटते की केंद्राच्या हस्तक्षेपाशिवाय येथे फूट पाडणे शक्य नाही. 19 जूनला भाजपने मेहबुबा सरकारचा पाठिंबा काढला होता. त्यानंतर पीडीपीमध्ये पाच आमदारांनी बंडखोरी केली. त्यांचे म्हणणे आहे की, पार्टी त्यांच्या आमदारांचा सन्मान करत नाही. पराभूत झालेले लोक पीडीपी पक्ष चालवत आहे. 

 

पीडीपीच्या पाच आमदारांनी नुकतेच पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यात आमदार आबीद हुसैन अन्सारी, त्यांचे पुतणे इम्रान हुसैन अन्सारी, तंगमार्गचे आमदार मोहम्मद अब्बास वानी आणि पट्‌टनचे आमदार इम्रान अन्सारी यांचा समावेश होता. वानी यांनी हा पक्ष 'परिवार डेमोक्रॅटिक पार्टी' असल्याचे म्हटले होते. त्यानंतर बारामुलाचे आमदार जावेद हसन बेग यांनीही पार्टी हायकमांड विरोधात दंड थोपटले. बेग म्हणाले होते की, पक्ष त्यांच्या आमदारांचा सन्मान करत नाही. पराभूत झालेले लोक पक्ष चालवत आहेत. नेतृत्व आमदारांना महत्त्व देत नाही आणि मी या पक्षासाठी 20 वर्षे वाया घालवली. 


जागतिक दहशतवादी आहे सलाहुद्दीन
यासीन मलिक काश्मीरचे फुटीरतावादी नेते आहेत. तर सय्यद सलाहुद्दीन हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या आहे. तो पाकिस्तानात राहतोय. काश्मीरमध्ये दहशतवाद परवण्याचे काम तो करतो. अमेरिकेनेही सलाहुद्दीनला जागतिक आतंकवादी जाहीर केले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी सलाहुद्दीनने म्हटले होते की, काश्मीरला भारतीय लष्कराचे कब्रस्तान बनवू. सलाहुद्दीनने 1987 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती पण तो पराभूत झाला. त्याला धोका दिल्याचा दावा त्याने केला होता. तो म्हणाला होता, आम्हाला शांततेच्या मार्गाने विधानसभेत जायचे होते, पण तसे करू दिले गेले नाही. आम्हाला अटक करून आमचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काश्मीर मुद्द्यावर शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे नाही. त्याने नोव्हेंबर 1990 मध्ये यूसुफ शाह नाव बदलून सय्यद सलाहुद्दीन केले. 

 

बातम्या आणखी आहेत...