आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PDP ने कधीही युतीचा एजेंडा सोडलेला नाही; आमच्यावर लावलेले आरोप खोटे -मेहबूबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या युतीचे सरकार पडल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी लावलेले आरोप पीडीपी अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी रविवारी फेटाळले आहेत. महबूबा म्हणाल्या, की पीडीपीने युतीच्या एजेंड्यापासून कधीच माघार घेतली नाही. आपल्या पक्षावर लावले जाणारे आरोप खोटे आहेत असेही माजी मुख्यमंत्री महबूबा यांनी सांगितले. शहा यांनी शनिवारी जम्मूत एका सभेला संबोधित करताना म्हटले आहे, की जम्मू आणि काश्मीरच्या विकासाचे लक्ष्य पूर्ण होत नसल्याच्या परिस्थितीत भाजपने या राज्यातील सत्तेवर राहण्यास काहीच अर्थ नव्हते. 


चर्चा करणे आवश्यक होते -मेहबूबा
महबूबा यांनी केलेल्या ट्वीटप्रमाणे, "युतीचा एजेंडा राम माधव आणि राजनाथ सिंह यांच्यासापख्या ज्येष्ठ नेत्यांनी तयार केला होता. आणि हा एजेंडा पूर्ण करण्यात आम्ही कुठल्याही प्रकारची हय-गय केलेली नाही. हे पाहून दुख वाटते, की भाजपने आपली हात झटकले. तसेच उलट पीडीपीने एजेंडा पूर्ण केला नाही असे आरोप लावले. आम्ही सुधारणांसाठी जी पावले उचलली त्यामुळे परिणाम जमीनी स्तरावर लोकांचा सरकारवर विश्वास वाढला. भाजपने सुद्धा हे मान्य करून त्याचे कौतुक केले होते. कलम 370 कायम ठेवणे असो वा हुर्रियत नेत्यांशी चर्चा करणे या सर्व गोष्टी आपला एजेंडा होता. जमीनी पातळीवर विश्वास संपादित करणे आणि चर्चा करणे अत्यावश्यक होते."


भाजपने आपल्या मंत्र्यांचे समीक्षण करावे...
माजी सीएम पुढे म्हणाल्या, "जम्मू आणि लद्दाख यांच्या भेदभावाच्या आरोपांमध्ये तथ्य नाहीत. काश्मीर खोऱ्यात नेहमीच अशांतता आहे. परंतु, 2014 च्या पुराने खूप मोठा झटका दिला होता. अशा परिस्थितीत पूर्णपणे लक्ष ठेवून काळजी घेणे आवश्यक होते. परंतु, याचा अर्थ असा होत नाही, की दुसऱ्या ठिकाणी विकासकामांमध्ये काही कसूर दिसून आला. भाजपाने आपल्याच मंत्र्यांचे समीक्षण करायला हवे आहे. त्यांना गेल्या 3 वर्षांत काहीच चिंता वाटली नाही. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये होणाऱ्या भेदभावावर सुद्धा त्यांनी चर्चा केली नाही.

बातम्या आणखी आहेत...