आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Merchants Can Not Any Extra Charges On Debit Card Payment; According To RBI Notification

कार्ड स्वाइपच्या नावावर दुकानदार घेऊ शकत नाहीत 2% एक्स्ट्रा चार्ज, असे झाल्यास येथे करा तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - डेबिट आणि क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास अनेकदा दुकानदार 2% एक्स्ट्रा चार्ज घेतात. परंतु RBIच्या नियमांमध्ये एक्स्ट्रा चार्ज घेण्याचा कोणताही उल्लेख नाहीये. यासाठी 17 सप्टेंबर 2013 रोजी RBIचे प्रिन्सिपल चीफ जनरल मॅनेजर जी. जगनमोहन राव यांनी एक नोटिफिकेशन जारी केली होती. यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले होते की, व्यापाऱ्यांनी एखाद्या ग्राहकाने कार्ड पेमेंट केल्यावर अतिरिक्त शुल्क वसूल करणे चुकीचे आहे. अशा व्यापाऱ्यांशी बँक कोणतेही संबंध ठेवणार नाही.

 

RBIची आहे ही प्लॅनिंग
2% च्या नावावर एक्स्ट्रा चार्ज वसूल करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध RBIने नवी प्लानिंग केली आहे. याच्या मदतीने ग्राहकांना फायदा होईल.
RBI ने बँकांना म्हटले आहे की, त्यांनी दुकानदारांकडे डमी कस्टमर पाठवावे आणि जे कुणी पॉइंट ऑफ सेल्स (POS) मशीनने कार्ड स्वाइप केल्यास 2% एक्स्ट्रा चार्ज घेतात, त्यांची रिपोर्ट तयार करावी.
या रिपोर्टमध्ये ज्या दुकानदारांची नावे येतील त्यांचे POS मशीन सस्पेंड केले जाईल.
RBIचे बँकिंग लोकपाल जे. एल. नेगी म्हणाले की, त्यांचे नियंत्रण दुकानदारावर नसते, परंतु ज्या बँकेच्या POS मशीनने पैसा वसूल केला गेला आहे, त्या बँकेकडून तो पैसा परत कस्टमरच्या खात्यात जरूर वळवण्यात येईल.

 

व्यापाऱ्यांचा तर्क
मार्केट ऑपरेटिंग प्राइस (MOP) वर जे प्रोडक्ट आम्ही विकतो, त्यावर कार्ड स्वाइप केल्यास काहीही घेत नाही. परंतु ज्या प्रॉडक्टमध्ये कस्टमर बार्गेनिंग करतात आणि ती MOP वर नसते, ती कस्टमरला डिस्काउंट दिल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून एक्स्ट्रा चार्ज घेतो. एकूण दुकानदार कस्टमरला डिस्काउंटचे आमिष दाखवून कार्डने एक्स्ट्रा पेमेंट घेतात आणि दिलेले डिस्काउंट वसूल करतात.

 

एमडीआर कस्टमरला करू शकत नाही पासऑन
आरबीआयकडून जारी नोटिफिकेशननुसार, 20 लाख रुपयांपर्यंतचा व्यवहार करणाऱ्या दुकानदाराकडून मर्चंट डिस्काउंट रेट 0.4 टक्के घेतला जातो. तर 20 लाख रुपयांहून जास्त व्यवहार करणाऱ्या दुकानदाराकडून 0.9 टक्के एमडीआर (मर्चेंट डिस्काउंट रेट) घेतला जात आहे. नोटिफिकेशनमध्ये हे स्पष्ट आहे की, दुकानदार हा एमडीआर कस्टमरकडून वसूल करू शकत नाही.

 

येथे करा तक्रार
आरबीआयचे बंकिंग लोकपाल जे. एल. नेगी सांगतात की, जर एखाद्या कस्टमरकडून दुकानदाराने कार्ड स्वाइप केल्यावर पैसे वसूल केले, तर याची तक्रार केली जाऊ शकते. तक्रार लेखी स्वरूपात सेक्टर-17 येथील आरबीआई ऑफिसमध्ये देऊ शकतात. सेाबतच, bochandigarh@rbi.org.in वर ई-मेल अथवा 0172-2702271 वर कॉल करूनही सांगू शकतात.

 

 

बातम्या आणखी आहेत...