आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • उंदराने कुरतडल्या 12 लाखांच्या करकरीत नोटा Mice Destroy Bank Currency Notes Worth 12 Lakh At ATM In Assam

उंदराने कुरतडल्या 12 लाखांच्या करकरीत नोटा, 22 दिवसांपासून बंद होते ATM

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिनसुकिया (आसाम) - येथील एका एटीएममध्ये ठेवलेल्या 12.38 लाख रुपयांच्या करकरीत नोटा उदरांनी कुरतडून टाकल्या. स्टेट बंक ऑफ इंडियाचे हे ATM मागच्या 22 दिवसांपासून बंद होते. ते ठीक करण्यासाठी जेव्हा टेक्नीशियन तेथे पोहोचले, तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. बँक अधिकाऱ्यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.

तिनसुकियाचे एसपी मुग्धाज्योति महंता म्हणाल्या की, लैपुली परिसरात एसबीआयच्या एटीएमला 20 मे रोजी टेक्निकल अडचणींमुळे बंद करावे लागले होते. यादरम्यान उंदीर मशीनमध्ये शिरले आणि त्यांनी नोटा कुरतडल्या. 11 जून रोजी जेव्हा टेक्नीशियन मशीन दुरुस्त करण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्यांना 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचे तुकडेही जमिनीवर पडलेले आढळले.

 

वाचल्या 17 लाख रुपयांच्या नोटा
एसबीआयचे अधिकारी म्हणाले की, या एटीएमला गुवाहाटीच्या FIS: ग्लोबल बिजनेस सॉल्यूशन नावाची फायनान्स कंपनी चालवत होती. कंपनीने 19 मे रोजी एटीएममध्ये 29 लाख रुपये जमा केले होते आणि दुसऱ्याच दिवशी एटीएमने काम करणे बंद केले होते. तथापि, 17 लाख रुपयांच्या नोटा बरबाद होण्यापासून वाचल्या आहेत.

 

घटनेवरून उपस्थित केले जाताहेत अनेक प्रश्न
एसबीआयने तिनसुकिया पोलिस स्टेशनमध्ये या घटनेच्या चौकशीसाठी एफआयआर दाखल केली आहे. तथापि, ही घटनाच संशयाच्या भोवऱ्यात आहे. मशीनमध्ये ठेवलेल्या नोटा उंदरांनी कुरतडल्यावर यावर कुणाचाही विश्वास बसत नाहीये. घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिकांनी सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले. एवढ्या दीर्घकाळ ATM बंद का होते? टेक्नीशियनला बोलवण्यासाठी एवढा काळ का घालवला?

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेशी संबंधित आणखी Photos.. 

बातम्या आणखी आहेत...