आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुवाहाटी - आसाममधील माजुली बेटावर गुरुवारी वायुसेनेचे एक विमान कोसळले. यात दोन पायलट्सचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हे मायक्रोलाइट एअरक्राफ्ट (Virus SW80) रुटीन फ्लाइट होते. अशी माहिती आहे की तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडली आहे. विमानाने जोरहाट एअरबेसवरुन उड्डाण केले त्यानंतर काही वेळातच ते कोसळले. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
आधीही झाल्या दुर्घटना
- मागील वर्षी 6 जुलै रोजी जोधपूर जिल्ह्यातील बालेसर येथे शिकाऊ फायटर जेट मिग-23 क्रॅश झाले होते. या दुर्घटनेत दोन्ही पायलट्स बचावले होते.
- तेलंगणामध्ये 24 नोव्हेंबरला एक शिकाऊ विमान कोसळले होते. यामध्ये महिला पायलट होती. सुदैवाने पायलटला काही झाले नाही. ही दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचे सांगितले गेले होते.
- 28 सप्टेंबरला एअरफोर्सचे किरण एअरक्राफ्ट हाकिमपेट जिल्ह्यात कोसळले होते. यात तीन जण होते, तिघेही सुरक्षित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.