आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंजवा ग्राउंड रिपोर्ट: शहीदाची मुलगी म्हणाली- 3 तास बेडखाली लपून होतो, श्वासाचाही आवाज होऊ दिला नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंजवां हल्ल्यानंतर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. - Divya Marathi
सुंजवां हल्ल्यानंतर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

जम्मू-काश्मीर - जम्मूच्या सुंजवां आर्मी कॅम्पवर 15 वर्षांनंतर सर्वात मोठा हल्ला झाला. 55 तासांच्या चकमकीत 6 जवान शहीद झाले. यात एका जवानाच्या पित्याचाही मृत्यू झाला आहे. 3 अतिरेकी मारले गेले. लष्करप्रमुखांनी कारवाईचे नेतृत्व केले. संरक्षण मंत्र्यांनी सोमवारी सायंकाळी ऑपरेशन संपल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर गोविंद चौहान यांचा वृत्तांत... 

शहीद सुभेदार मदनलाल चौधरींची कन्या 20 वर्षांची आहे. तिच्या पायाला गोळी लागल्याने लष्करी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तिने सांगितले की, 'त्या सकाळी मी मम्मी-पप्पा, मावशी व मावसभाऊ सरकारी निवासस्थानात झोपलो होतो. अचानाक कोणीतरी दरवाजा ठोठावला आणि झोप मोडली. भावाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, त्याला वडिलांनी रोखले. वडिलांना काही कळण्याच्या आत गोळी बार सुरु झाला. माझ्या पायाला गोळी लागली. वडिलांनी सर्वांना आतल्या खोलीत पाठवले आमि स्वतः दरवाजाकडे गेले. यावेळी ते मोठमोठ्याने दहशतवादी आहेत, दहशतवादी आहेत असे ओरडत होते. चहुबाजूने आरडाओरड होत होती. वडिलांचा फोन घेऊन अधिकाऱ्यांचे क्रमांक डायल केले. मात्र, उत्तर मिळाले नाही. तीन तासापर्यंत मी, मावशी आणि भाऊ रुममध्ये दडून बसलो होतो. वडील बाहेरच्या खोलीत होते. त्यांचे काय झाले कळाले नाही. तरीही अधिकाऱ्यांना एसएमएस करत राहिलो. यानंतर कोणीतरी वडिलांच्या नावाने हाक मारली. बाहेर येऊन पाहिले तेव्हा रुममध्ये रक्ताचा सडा पडला होता. मात्र वडील तिथे नव्हते. या दरम्यान बचावासाठी आलेल्या जवानाने मला व मावशीस हॉस्पिटलमध्ये नेले. या तीन तासांत आम्ही रुमबाहेर श्वासांचाही आवज जाणार नाही याची दक्षता घेतली होती. आम्हाला वाचवताना वडील शहीद झाल्याचे हॉस्पिटलमध्ये कळाले.'

 

लान्सनायक बहादूरसिंगही रुग्णालयात दाखल होते. त्यांनी सांगितले की, “त्या दिवशी माझी पहारेकऱ्याची ड्युटी होती. नाक्यावर बसलो होतो. सकाळी उजडल्यानंतर ड्युटी संपणार होती. घराजवळच माझी ड्युटी आहे. पहाटे सव्वापाच वाजता दोघे जण धावत निवासस्थानाकडे जात असल्याचे दिसले. त्याआधी गोळीबाराचा आवाज आला होता तेव्हा अतिरेकी असल्याची जाणीव झाली. मी त्यांच्यावर निशाणा साधला तेव्हा अतिरेक्यंानी अंधाधुंद गोळीबार केला. माझ्या हाताला गोळी लागली त्यामुळे शस्त्र चालवू शकत नव्हतो. त्यामुळे त्वरित फोन काढून अन्य नाक्यावर तैनात जवानास अतिरेक्यांचा ठावठिकाणा सांगितला. त्याच्याकडे स्नाइपर रायफल असल्याचे सांगितले. यानंतर अापले सुभेदार व निवासस्थानात राहणाऱ्या सहकाऱ्यांना फोन करून सतर्क केले. सर्वांना आतमध्येच थांबण्याची ताकीद दिली. बराच वेळ नाक्यावरच राहिलो. मात्र, यादरम्यान अतिरेकी बेपत्ता झाले. यानंतर आणखी जवान आले व नाकेबंदी नाक्यावरून मला उतरवले.’

 

पुढील स्लाइडमध्ये, जखमी सुभेदार यांनी सांगितले दहशतवादी घुसले...

बातम्या आणखी आहेत...