आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्री बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार, वडिलांनी पाहताच पळून गेले आरोपी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहारनपूर (यूपी) - येथील नानौता परिसरात एका पित्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे की, सोमवारी मध्यरात्री जेव्हा त्यांना झोपेतून जाग आली तेव्हा गावातीलच दोघे जण त्यांच्या अल्पवयीन मुलीवर बंदुकीच्या धाकावर बलात्कार करत होते. त्यांना जागे झालेले पाहताच आरोपींनी तेथून पळ काढला.

 

अश्लील व्हिडिओ शूट करून करत होते ब्लॅकमेल
- पीडित वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची कन्या अल्पवयीन आहे. आरोपी मागच्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या मुलीचे लैंगिक शोषण करत होते. आरोपींनी त्यांच्या मुलीची अश्लील व्हिडिओ क्लिप बनवलेली होती. यामुळे आरोपी त्यांच्या मुलीला धमकी देऊन तिच्यावर नेहमी बलात्कार करत होते.

 

अल्पवयीन मुलगी 3 महिन्यांची गर्भार
- दुसरीकडे पीडितेने सांगितले की, ती 3 महिन्यांची गर्भवती आहे. पीडितेने पोलिसांत तक्रार दिली की, आरोपींविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. दुसरीकडे, पोलिस म्हणाले की, याप्रकरणी लवकरात लवकर चौकशी करून आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.

 

बातम्या आणखी आहेत...