आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेपनंतर 3 वर्षांची चिमुरडी हॉस्पिटलमध्ये रडत होती, आईने पैसे देऊन काढली समजूत- बेटा शांत हो, घरी जाऊ.. आईस्क्रीम खाऊ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - मंदसौर, सतनानंतर आता जयपुरात 3 वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. अबोध, निरागस चिमुरडी. तो वासनांध नराधम होता. चिमुरडी खेळात मग्न होती, तर हा नराधम नशेत तर्रर... जयपूरच्या कानोतामधून प्रत्येक आईवडिलांना हादरवून सोडणारी बातमी आली आहे. सोमवारी रात्री 10 वाजता आपल्या 2 भावाबहिणींसोबत घराबाहेर लपाछपी खेळत असलेल्या 3 वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच शेजारी राहणाऱ्या पवन (24) याने रेप केला. आरोपी तरुण नशेत तर्रर होता. येताच त्याने मुलीचा गळा आवळून तिच्यावर बळजबरी सुरू केली. तिच्यासोबत खेळत असलेला 4 वर्षांचा भाऊ आणि 2 वर्षांची बहीण भिऊन घरात पळून गेले. चिमुरडी किंचाळू लागली. तिचा आवाज ऐकून आई आली तेव्हा आरोपी पळून गेला. चिमुरडीला जेके लोन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अख्खी रात्र आई तिच्या उशाला बसून जागून काढली. हॉस्पिटलमध्ये चिमुरडी वेदनांनी ओरडू लागली तेव्हा आईने तिच्या हातात काही पैसे ठेवले, म्हणाली- शांत हो बाळा.. आपण घरी जाऊ, मग तू आईस्क्रीम खा. मग यानंतर आईसुद्धा ढसाढसा रडायला लागली. जेके लोन हॉस्पिटलचे डेप्युटी सुपरिंटेंडेंट डॉ. अर्चना जौहरी म्हणाल्या, सर्जरी आणि गायनिक डॉक्टरांच्या देखरेखीत तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीला नंतर अटक करण्यात आली. चिमुरडीचे कुटुंब कानोता बांधजवळ किरायाच्या घरात राहते.

 

आरोपीने केलेली 3 पाशवी कृत्ये...

 

> शरीरावर हल्ला 
घटनेनंतर चिमुरडीच्या गळ्यावर व पोटात प्रचंड वेदना होऊ लागल्या. रक्त वाहू लागले. रक्तबंबाळ चिमुरडीला उचलून आईवडील पोलिसांत गेले. त्यांनी मुलीला एसएमएस हॉस्पिटलमध्ये नेले, तेथून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले.

 

> मानसिक धक्का
आरोपी पवन ट्रॅक्टरवर विटा भरण्याचे काम करतो. चिमुरडी त्याला प्रेमाने अंकल म्हणून हाक मारायची. जेव्हा तो पाशवी कृत्य करण्यासाठी आला, तेव्हा तिला वाटले तो खेळायलाच आला आहे.

 

> जन्मभराच्या वेदना
चिमुरडी सोमवारी पहिल्यांदाच शाळेत गेली होती. रात्री दहापर्यंत तिने तिचा शाळेचा गणवेशही काढला नव्हता. आईला कुठे माहिती होते की, तिचा शाळेचा पहिला दिवस, तिच्यासाठी हॉस्पिटलचा पहिला दिवस बनून जाईल.

 

ही 3 पावले जी आता आम्ही उचलणार

- पॉक्सोमध्ये फाशीची पहिली केस बनावी. यासाठी भास्कर तथ्यांपर्यंत जाईल. न्यूज कॅम्पेन चालवणार. अल्पवयीन चिमुरडीवर बलात्काराचा आरोपी फाशीपर्यंत पोहोचावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पॉक्सो कोर्ट उघडण्यासाठी अभियान चालवणार.

 

- स्पीडी ट्रायलचा प्रयत्न
चिमुरडींना रक्तबंबाळ करणारे कोर्ट नसल्याने, तपासाची संथगती आणि लालफीतशाहीमुळे कोर्टातून सुटत आहेत. भास्कर लगातार न्यूज कॅम्पेन चालवणार. या केसमध्ये तपास वेगवान व्हावा, यासाठी प्रयत्न करणार.

 

- अलर्ट कॅम्पेन...
चिमुकल्यांच्या सुरक्षेप्रति समाज जागरूक बनावा यासाठी भास्कर अलर्ट कॅम्पेन सुरू करणार. त्यांच्या सुरक्षेशी संबंधित नियमांवर निगराणीसाठी भास्कर लगातार रिअॅलिटी चेक कॅम्पेन चालवत राहील. लहान मुलांशी संबंधित जागा उदा. पार्क, शाळेच्या आसपास कॅमेरे लागावे.. गार्ड असावेत.. यासारखे महत्त्वाचे मुद्दे उचलत राहणार.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेशी संबंधित आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...