आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K चा तो पोलिस अधिकारी बनला हिज्बुलचा दहशतवादी, 4 AK-47 सह झाला होता बेपत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या पॅम्पोर येथून बेपत्ता झालेला विशेष पोलिस अधिकारी (SPO) आता हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बनला आहे. पॅम्पोर पोलिस स्टेशनमधून तो एके-47 रायफलसह बेपत्ता झाला होता. एसपीओ इरफान अहमद दार याने हिज्बुल मुजाहिद्दीन जॉइन केल्याची घोषणा हिज्बुलचा प्रवक्ता बुऱ्हाणुद्दीन याने केली अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. यासंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

 

हिज्बुलचा प्रवक्ता म्हणाला...

हिज्बुलचा प्रवक्ता बुऱ्हाणुद्दीनने सांगितल्याप्रमाणे, "पुलवामा जिल्ह्यातील नेहामा काकापोरा येथील रहिवासी एसपीओ इरफान अहमद दार अहमद याने हिज्बुल मुजाहिद्दीनचे सदस्यत्व स्वीकारले आहे. हा तोच अधिकारी आहे, जो 4 सरकारी रायफलींसह बेपत्ता झाला होता."

 

मंगळवारपासून होता बेपत्ता

दार हा मंगळवारपासून 4 सरकारी रायफली घेऊन बेपत्ता झाला होता. काश्मीर पोलिस त्याचा गेल्या 24 तासांपासून शोध घेत होते. परंतु, अचानक दहशतवादी संघटनेने ही घोषणा केली आहे. जम्मू काश्मीरात विशेष पोलिस अधिकाऱ्यांना एका विशिष्ट मानधनासह दहशतवाद विरोधी कारवायांसाठी नियुक्त केले जाते. त्यांना कुठल्याही प्रकारची विशेष ट्रेनिंग दिली जात नाही. त्यांना शस्त्रास्त्र बाळगण्याचे किंवा ते चालवण्याचे सुद्धा प्रशिक्षण दिले जात नाही. 

 

2015 मध्येही घडल्या अशा घटना
> शकूर अहमद उर्फ माशूक बेशक 2016 मध्ये दहशतवादी बनलेला पहिला पोलिस होता. परंतु, 2015 मध्ये सुद्धा पोलिसांनी दहशतवाद्यांचा रस्ता पकडल्याची उदाहरणे सापडली आहे. सद्यस्थितीला 130 पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर विविध दहशतवादी संघटनांना मदत केल्याप्रकरणी खटले विचाराधीन आहेत. 
> 27 मार्च रोजी तत्कालीन मंत्री अल्ताफ बुखारी यांच्या घरावर तैनात पोलिस कर्मचारी नसीर अहमद पंडित सुद्धा दोन रायफली घेऊन पसार झाला होता. त्याने देखील नंतर हिज्बुलचे सदस्यत्व स्वीकारले. 
> यानंतर डोडा जिल्ह्यात 2 पोलिस कर्मचारी बशीर अहमद आणि मोहम्मद रियाज सप्टेंबर 2015 मध्ये हिज्बुलचे सदस्य बनले. त्यांना 15 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. दक्षिण काश्मीरच्या जाडूरा-पुलवामा येथे 27 नोव्हेंबर 2015 रोजी पोलिस कर्मचारी सय्यद मुफीद बशीर उर्फ रकीब दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...