आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक माल्यावर टीका करतात, पण ते स्मार्ट आहेत! केंद्रीय मंत्री ओराम यांची मुक्ताफळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- ओराम यांनी नंतर असे स्पष्टीकरण दिले की, त्यांनी चुकून माल्याचे नाव घेतले होते. 

- ओराम यांच्या मते, आदिवासींना आरक्षणामुळे नकसलान सहन करावे लागत आहे. 
 

हैदराबाद - केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी आदिवासांचा उत्साह वाढवण्यासाठी केलेल्या भाषणात फरार उद्योगपती माल्याचे उदाहरण दिले. ओराम शुक्रवारी हैदराबादेत राष्ट्रीय जनजातीय आंत्रप्रिन्योर कॉन्क्लेव्ह 2018 मध्ये बोलत होते. ते म्हणाले, लोक माल्यावर टीका करतात. पण माल्या कोण आहे? तो एक स्मार्ट व्यक्ती आहे. त्याने आधी हुशार लोकांना कामावर ठेवले आणि नंतर बँका, सरकार आणि राजकारण्यांवर प्रभाव पाडला. 

 
ओराम म्हणाले, तुम्हाला स्मार्ट बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आदिवासी प्रशासनावर आपला प्रभाव टाकू शकत नाही का? बँकांवर दबाव आणण्यापासूनही तुम्हाला कोण रोखू शकते? मात्र नंतर स्पष्टीकरण देताना ओराम म्हणाले की, त्यांनी चुकून माल्याचे नाव घेतले होते. मुला दुसरेच कोणाचे तरी नाव घ्यायचे होते. माल्यावर भारतीय बँकांचे 9 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचे कर्ज आहे. मार्च 2016 मध्ये फरार झाल्यानंतर सध्या माल्या लंडनमध्ये आहेत. भारताने त्याला फरार घोषित केले आहे. माल्याला देशात परत आणण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...