आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी ब्रिटनला जाणार मोदी Narendra Modi, Britain, Vijay Mallya

शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी ब्रिटनला जाणार मोदी, आयोजनापासून माल्ल्याला दूर ठेवण्याचे प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रिन्स चार्ल्स नोव्हेंबरमध्ये पत्नी कॅमिला पार्कर बाउल्ससोबत भारतात आले होते, तेव्हा त्यांनी मोदींना शिखर संमेलनात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते.
  • FERA उल्लंघनप्रकरणी पतियाळा हाऊस कोर्टने माल्ल्याला फरार गुन्हेगार घोषित केलेले आहे.

 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनमध्ये होणाऱ्या ‘कॉमनवेल्थ हेड ऑफ गव्हर्नमेंट’च्या शिखर संमेलनात सहभागी होतील. हे संमेलन 18-19 एप्रिल रोजी होईल. मोदी 17 एप्रिलला लंडनला पोहोचतील आणि येथे अनेक द्विपक्षीय कार्यक्रमांमध्ये भाग घेतील. यादरम्यान त्यांचे दोन प्रमुख सार्वजनिक कार्यक्रमही होतील. एक सायन्स म्यूजियममध्ये आणि दुसरे क्रिस इन्स्टीट्यूटमध्ये. या दोन्ही ठिकाणी असलेल्या गेस्ट लिस्टवर भारताच्या विदेश मंत्रालयाची नजर आहे. कारण 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून पळून गेलेला विजय माल्ल्या या कार्यक्रमांत सामील होऊ नये यासाठी मंत्रालय विशेष दक्षता घेत आहे. 

 

कार्यक्रमात प्रिन्स चार्ल्सही हजर राहतील
- सायन्स म्युझियमच्या कार्यक्रमात प्रिन्स चार्ल्सही हजर राहतील. लंडनमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद आणि ब्रिटेनच्या कॉलेज ऑफ मेडिसिनदरम्यान एका कराराअंतर्गत आयुष सेंटर ऑफ एक्सिलेंस उघडत आहे. प्रिन्स चार्ल्स आणि मोदी या सेंटरच्या उद्घाटनाचे साक्षीदार होतील.

माल्या-नीरवमुळे आधी झालेले आहेत विवाद

 

माल्याला पाहून डिप्लोमॅटने सोडला होता कार्यक्रम
- जून 2016 मध्ये लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भारताचे उच्चायुक्त नवतेज सरनाही हजर होते. तेथे माल्याही पोहोचला. त्याला पाहताच उच्चायुक्तांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.
- नंतर विदेश मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले होते की, कार्यक्रमाचे आयोजन भारतीय उच्चायुक्तांनी केले नव्हते. तो कार्यक्रम लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये आयोजित करण्यात आलेला होता.

 

विराटच्या इव्हेंटमध्ये न बोलावता पोहोचला होता...
- विजय माल्ल्या मागच्या वर्षी 5 जून रोजी लंडनमध्ये झालेल्या विराट कोहलीच्या एका चॅरिटी कार्यक्रमातही दिसला होता. हा कार्यक्रम ह्यूमन ट्रॅफिकिंगविरुद्ध काम करणाऱ्या एक संघटनेकडून आयोजित करण्यात आला होता.
- या इव्हेंटमध्ये कोहली आणि टीमचे इतर मेंबर्स माल्ल्याच्या उपस्थितीमुळे त्रस्त दिसले. वास्तविक, माल्ल्याला विराटच्या फाउंडेशनने निमंत्रित केले नव्हते."

 

इंडिया-साऊथ आफ्रिका मॅचमध्ये प्रेक्षकांनी केली शेरेबाजी
- विजय माल्ल्या मागच्या वर्षी जूनमध्येच भारत-दक्षिण आफ्रिका मॅच पाहण्यासाठी आफ्रिकेत पोहोचला होता. माल्ल्याला पाहून स्टेडियमबाहेर उभ्या लोकांनी त्याच्यावर शेरेबाजी केली होती.  
- एक फॅन म्हणाला- ते पाहा चोर जात आहे. यानंतर तेथे उपस्थित अनेक भारतीयांनी चोर-चोरचे नारे लावणे सुरू केले होते.

 

नीरव मोदीसोबत पंतप्रधानांचा फोटो झाला व्हायरल
- याच वर्षी जानेवारीत दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका ग्रुप फोटोमध्ये मोदीसोंबत देशातील अनेक बिझनेसमन दिसले होते. यात 12 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीही होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली होती. यानंतर भाजपला यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते.

 

माल्ल्यावर 9000 कोटींहून जास्तीचे कर्ज
- विजय माल्ल्‍याच्या किंगफिशर एअरलाइन्सवर 31 जानेवारी 2014 प पर्यंत बँकांचे 6,963 कोटींचे कर्ज थकीत होते. या कर्जावरील व्याजानंतर माल्ल्याचे एकूण कर्ज 9,432 कोटी रुपये झाले आहे.
- माल्ल्या 2 मार्च 2016 पासूनच लंडनमध्ये राहत आहे. ईडी आणि सीबीआय यांना तो हवा आहे. ईडीने अनेकदा त्याला समन्सही बजावला आहे.
- प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) शी निगडित एका प्रकरणात मुंबईच्या एका स्पेशल कोर्टाने आणि FERA उल्लंघन प्रकरणात पतियाळा हाऊस कोर्टाने माल्ल्याला फरार गुन्हेगार घोषित केलेले आहे.
- माल्ल्याचा पासपोर्टही रद्द करण्यात आलेला आहे. याच वर्षी फेब्रुवारीत भारताने ब्रिटनला माल्ल्याच्या प्रत्यार्पणाची अपील केली होती. यावर जूनपर्यंत निर्णय येऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...