आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी महिला दिनी कुंवरबाईंना वाहिली श्रद्धांजली, म्हटले - त्या बापुंच्या स्वप्नासाठी झटल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंवर बाईंनी शौचालय तयार करून घेण्यासाठी त्यांच्या बकऱ्या विकल्या होत्या. - Divya Marathi
कुंवर बाईंनी शौचालय तयार करून घेण्यासाठी त्यांच्या बकऱ्या विकल्या होत्या.

नवी दिल्ली - आज अंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. या निमित्ताने नरेंद्र मोदींनी छत्तीसगडच्या सामाजिक कार्यकर्त्या कुंवर बाई यांना श्रद्धांजली अर्पण केली. कुंवर बाईंना स्वच्छ भारत अभियानाच्या दूत (मॅस्कोट) बनवले. कुंवर बाई यांनी शौचालय तयार करण्यासाठी त्यांच्या बकऱ्या विकल्या होत्या. 


मोदींनी केले ट्वीट 
- मी नेहमीच तो क्षण आठवतो जेव्हा मी छत्तीसगडच्या दौऱ्यावर असताना मला कुंवरबाईचा आशिर्वाद घेण्याची संधी मिळाली होती. त्या आजही आपल्या मनात जीवंत आहेत. त्या कायम महात्मा गांधींच्या स्वच्छ भारतच्या स्वप्नासाठी झटत राहिल्या. 
- #SheInspiresMe नावाने केल्या ट्वीटमध्ये मोदींनी म्हटले की, कुंवरबाईंचे 106 व्या वर्षी निधन झाले होते. संपूर्ण छत्तीसगड त्यांचा सन्मान करते. त्यांनी शौचालय तयार करण्यासाठी बकऱ्याही विकल्या होत्या. स्वच्छ भारतसाठी त्यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या कामातून मला खूप प्रेरणा मिळाली. 
- अनेक महिलांनी मानवी इतिहासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कामातून अनेक पिढ्यांना प्रेणा मिळेल. तुम्हाला ज्या स्त्रीने प्रेरणा दिली तिच्याबाबत लिहा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. 
- मोदींनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर कुंवरबाई यांचा एक व्हिडिओही शेअर केला. मोदींनी कुंवरबाईला मां म्हणत त्यांच्या पाया पडले होते. 


कोण होत्या कुंवरबाई?
- कुंवरबाई स्वच्छतेच्या प्रेरणास्त्रोत बनल्या होत्या. घरात शौचालय तयार करण्यासाठी त्यांनी 8 बकऱ्या विकून 22 हजार रुपये जमवले होते. त्यानंतर त्या देशभरात प्रसिद्ध झाल्या होत्या. 
- धमतरी जिल्ह्यातील राहणाऱ्या कुंवर बाई यांचे 106 व्या वर्षी निधन झाले होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...