आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या भाषेचा स्तर घसरतोय; अशी भाषा कोणाचीही नव्हती: मनमोहन सिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो अॅपद्वारे कर्नाटक भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, स्टार्टअपच्या जगात येथील युवकांचे नाव मोठे आहे. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात हिंसाचार झाला. त्यानंतर हिंसाचार आपल्या राजकारणाचा भाग झाला आहे, असे वाटते. आमचे कार्यकर्ते त्रिपुरा, केरळ आणि कर्नाटकात मारले गेले आहेत. हे लोकशाहीसाठी योग्य नाही. हिंसा थांबायला हवी. लोकशाहीत हिंसेला जागा नाही. एखाद्या व्यक्तीने विश्वास गमावला, त्याच्याकडे बोलण्याची, सत्य स्वीकारण्याची ताकद नसली की मग तो हिंसाचाराचा मार्ग निवडतो.  

 

जीएसटी-नोटबंदी सर्वात मोठी चूक : सिंग  

कर्नाटकात बंगळुरूत सोमवारी मनमोहनसिंग यांनी पत्रपरिषद घेतली. त्यांनी मोदींची भाषा, त्यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले... 

 

भाषेच्या स्तरावर...

मोदी ज्या प्रकारच्या भाषेचा वापर करत आहेत तसा कोणत्याही पंतप्रधानाने केला नव्हता. हे वागणे पंतप्रधानांसारखे नाही. ते सतत स्तर कमी करत आहेत. ही देशासाठी चांगली गोष्ट नाही.  

 

बँकिंग घोटाळ्यावर... 
नीरव मोदींबाबत बोलायचे तर २०१५-१६ मध्य तो डील करत होता. पण सरकारने काही केले नाही. पीएम मोजी जेव्हा दाव्होसमध्ये होते, तेव्हा नीरव मोदीही त्यांच्यासोबत होता. नंतर काही दिवसांनीच तो पळून गेला.  

 

पुढील स्लाईडवर पहा राहुल गांधींचा बैलगाडीवर रोड शो ..... 

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...