'राम मंदिर व्हावे ज्यांना वाटते, त्यांना स्वतःला आधी राम व्हावे लागेल, अडचणी दूर करता येतील' - भागवत
राम मंदिर बांधण्याची इच्छा असणाऱ्यांना आधी राम व्हावे लागेल, असे भागवत म्हणाले. (फाइल)
छतरपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. भागवत म्हणाले, ज्यांना राम मंदिर बांधण्याची इच्छा आहे, त्यांना आधी राम व्हावे लागेल. मंदिर निर्माणातील अडचणी दूर करता येतील. मागील वर्षी कर्नाटकातील उडुपी येथे झालेल्या धर्म संसेदत भागवत म्हणाले होते, की राम जन्मभूमीवर दुसरा कोणताच ढाचा नाही तर फक्त राम मंदिर उभे राहिल. हा आमच्या आस्थेचा प्रश्न आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.
राम मंदिर निर्माण इच्छा नाही, संकल्प
- भागवत म्हणाले, 'राम मंदिर बनणार आहे. ती केवळ तुमची आणि माझी इच्छा नाही तर तो आमचा संकल्प आहे. आम्हाला हा संकल्प पूर्ण करायचा आहे.'
- '1988 पासून मंदिर होणार असे म्हटले जाते. मंदिर निर्माणात असलेल्या छोट्या-मोठ्या अडचणी दूर होतील, परंतू मुख्य अडचण आहे ज्यांना राम मंदिर निर्माण करायचे त्यांना स्वतःला आधी रामा प्रमाणे व्हावे लागणार आहे. हे काम आम्ही जेवढ्या लवकर करु तेवढ्या लवकर प्रभू राम येथे अवतरतील.'
- भागवत म्हणाले, प्रभू रामाचे येथे मंदिर होईल याशिवाय दुसरे काही होणार नाही.
कर्नाटकाच्या धर्म संसदेतही राम मंदिराचा मुद्दा
- गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये कर्नाटकात धर्म संसद झाली होती. यासाठी 2 हजार साधू-संत आले होते.
- यावेळी भागवत म्हणाले होते, 'अयोध्येत राम मंदिर निर्माण होणार याबद्दल शंकेचे वातावरण निर्माण होण्याची गरज नाही. आम्ही ते तयार करणारच आहोत. हे काही जनतेला आकर्षित करणारी घोषणा नाही तर हा आमच्या आस्थेचा प्रश्न आहे. त्यासाठी फक्त जनतेला जागरुक करण्याची गरज आहे.'