आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूज अँकरसोबत टवाळखोरांनी केली छेडछाड, FB पर फोटो पोस्ट करून सांगितला प्रसंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगरा (उत्तर प्रदेश)- शहरातील हरीपर्वत पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात 25 जानेवारी रात्री 10 वाजता एका न्यूज अँकरशी दोन टवाळखोरांनी छेडछाड केली. त्यांनी तिचा पाठलाग सरू केला. प्रसंगावधान राखत तरूणीने त्यांचे फोटो काढले. हे पाहून दोन्ही टावाळखोरांनी तेथून पळ काढला. यानंतर अँकर तरूणीने याची तक्रार वुमन पॉवर हेल्पलाइनवर केली, परंतु चार दिवस उलटले तरी त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. यानंतर तरूणीने नाइलाजाने फेसबुकवर पोस्ट करून आपल्यासोबत घडलेला प्रसंग शेअर केला. यावर आयजी नवनीत सिकेरा यांनी ट्विट करून अॅक्शन घेण्याचे निद्रेश दिले. 


FACEBOOK वर व्यक्त केले दुख्ख...
- दामिनीनुसार, ती अॅक्टीवावरून घरी जात होती. तेवढ्यात दोन तरूणांनी तिची छेड काढण्यास सुरूवात केली. हे पाहून तिने रस्ता बदलून एमजी रोडकडे गाडी वळवली. टवाळखोर तरि देखील तिचा पाठलाग करतच होते. काही अंतर पार केल्यानंतर तरूणीने गाडी थांबवली आणि मोबाइलमध्ये त्यांचे फोटो क्लिक केले. तेव्हा दोन्ही टवाळखोरांनी हसत हसत पोज देत फोटो काढले आणि नंतर आपल्या गाडीचा नंबर फेक असल्याचे सांगत तेथून निघून गेले.0
- टवाळखोरांची तक्रार 1090 वर केली, परंतु चार दिवस उलटले तरी कोणतीही कार्यवाही झाली नाही. मला वाटले मी जर भीऊन गप्प राहीले, तर इतर तरूणी देखील हिम्मत करू शकणार नाहीत. त्यामुळे मी 28 जानेवारीला सोशल साइटचा आधार घेतला.
- यानंतर आयजी नवनीत सिकेरा यांनी ट्विटवर आगरा पोलिसांना कार्यवाहीचे निर्देश दिले. यानंतर तात्काळ प्रभाववरून दोन ऑपरेटरांना हटवण्यात आले. सोबतच आगराच्या एसएसपी अमित पाठक यांनी तात्काळ पोलिसांनी कार्यवाही करण्याचे निर्देस दिले.


पोलिस काय म्हणतात...?
-एसएसपी अमित पाठक यांच्या मते, तरूणीच्या तक्रारीवरून केस दाखल करण्यात आली आहे. तसचे, धाडसी तरूणीला पोलिसांनी विशेष सन्मानित देखली करणार आहे.
- त्यांनी सांगितले, 29 जानेवारीला एएसपी श्लोक कुमारच्या नेतृत्वात पोलिसांच्या टीमने दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपिंची ओळख साबाद आणि उबेद अशी झाली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...