आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्लाम (केरळ) - येथे एका आईने तिच्या 14 वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह जाळून घराच्या मागे फेकून दिला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की ही घटना राजधानी तिरुअनंतपूरमपासून 60 किलोमीटर दूर कोल्लम येथे सोमवारी घडली आहे.
मुलाचा खून करुन त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणारी महिला दुसऱ्या दिवशी पतीसोबत पोलिस स्टेशनला गेली आणि मुलगा हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांची चौकशी केल्यानंतर महिलेच्या जबाबात वेळोवेळी बदल होत होता. पोलिसांनी महिलेला तिचा हात कसा जळाला, असे विचारल्यानंतर ती समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. आरोपी महिलेचे नाव जया आहे.
बुधवारी पोलिसांनी घराची झडती घेतली तेव्हा घरापासून 200 मीटर अंतरावर पोलिसांना एक डेडबॉडी सापडली. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर 43 वर्षांच्या जयाने गुन्हा कबूल केला. यानंतर पोलिसांनी जयाला स्वतःच्या मुलाच्या खूनात अटक केली आहे.
जयाने 14 वर्षांचा मुलगा जीतू जॉब याची गळा आवळून हत्या केली आणि त्याचा मृतदेह जाळून घरापासून दूर काही अंतरावर फेकून दिला होता.
जयाने पोलिसांना सांगितले, की तिचा मुलगा जीतू तिला चिडवले होते. त्याचा राग आल्याने तिने त्याची हत्या केली. कोणी चिडवल्यानंतर एखाद्या व्यक्ती मानसिक नियंत्रण गमावू शकते, मात्र जयाच्या पतीने सांगितले की ती मानसिक दृष्ट्या स्थिर होती.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की जयाने कबूल केले आहे की तिने मुलाचा मृतदेह ओढत कंपाऊंडपर्यंत नेला आणि तिथे त्याला पेटवून दिले. त्यानंतर तिने जळालेला मृतदेह भिंतीच्या पलिकडे फेकून दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.