आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमृतसर - गोल्डन गेटजवळील दर्शन अॅव्हेन्यूमध्ये माय-लेकी गगनदीप वर्मा (41) आणि शिवनैनी वर्मा (21) यांची घरात हत्या करण्यात आली. पुरावे मिटवण्यासाठी आग लावण्यात आली. गगनदीपचे शरीर पूर्णपणे जळाले होते, तर मुलगी शिवनैनीचा मृतदेह 25 टक्के जळालेल्या अवस्थेत आढळले. त्यांचे हात-पाय बांधलेले होते, शरीरावर एकही कपडा नव्हता. यावरून बलात्कारानंतर हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
असे आहे प्रकरण..
- गगनदीप वर्मा जंडियालाच्या सरकारी कन्या शाळेत क्लर्क होत्या. मुलगी शिवनैनीने नुकतेच बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले होते.
- रात्री दोन वाजता शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या घरी आग लागलेली पाहिली. आरडाओरडा करून शेजाऱ्यापाजाऱ्यांना त्याने गोळा केले.
- गगनदीप यांची दोन लग्ने झालेली होती, दोन्ही मोडली होती. पोलिसांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी गगनदीप वर्मा यांनी येथे बंगला नंबर 175 खरेदी केला. अनेक वर्षांपूर्वीच गगनदीप यांचा घटस्फोट झालेला होता.
- त्या आपल्या दोन मुलांसह येथे राहत होत्या. मुलगा रिद्धिम 20 डिसेंबर रोजी शिक्षणासाठी कॅनडाला गेला होता. घरी आई-मुलगी राहत होत्या.
- ज्या प्रकारे घटना घडली त्यावरून वाटते की, यात 3 ते 4 जण सामील होते. पोलिसांच्या मते, हे हत्याकांड लव्ह-अफेअरच्या वादामुळे झालेले दिसत आहे. तथापि, दोघीही मायलेकींवर रेप झाला आहे का, याची पुष्टी पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर होईल.
ओळखीचेच होते हत्यारे...
- हत्यारे सोमवारी रात्री 9 वाजता घरी पोहोचले आणि पावणे दोन वाजेपर्यंत म्हणजेच साडे 4 तासांपेक्षा जास्त तेथे थांबले नाहीत. घरात बळजबरी कुणी घुसल्याचे आढळत नाही, शिवाय घरातील पाळलेले श्वान कुणावरही भुंकल्याचे इतर कुणी ऐकले नाही. यावरून पोलिसांना वाटते की, गगनदीप वा शिवनैनी यांना ओळखणारेच कुणीतरी घराचे मेनगेट उघडून आत शिरले असावे.
- एकट्या व्यक्तीने अशा प्रकारचे कृत्य करणे शक्य नाही, म्हणून यात 3 ते 4 जण सामील असतील. पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला.
- अमृतसरचे पोलिस कमिश्नर एसएस श्रीवास्तव म्हणाले की, सुल्तानविंड पोलिस स्टेशनमध्ये कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- एडीसीपी सिटी-वन जगजित सिंह वालिया यांच्या नेतृत्वात सीआईए स्टाफचे पथक मायलेकीशी निगडित प्रत्येक बाबीची चौकशी करत आहे.
पाणी शिंपडल्यावर रक्त बाहेर निघाले, तेव्हा कळले की आत मृतदेह आहे...
- एका शेजाऱ्याने सांगितले की, माहिती मिळाल्यावर 15 मिनिटांनी दोन वाजता आम्ही घटनास्थळी पोहोचलो. घराचा मुख्य दरवाजा उघडा होता आणि आता डाव्या बाजूच्या खोलीत रूमच्या मधोमध गाद्यांना आग लागलेली होती. रिकामा बेड भिंतीजवळ पडलेला होता.
- आम्ही अर्धवट जळालेल्या गाद्या बाहेर काढून पाणी ओतले, तेव्हा आतून पाण्यासोबतच रक्तही बाहेर येऊ लागले. तेव्हाच कळले आत मृतदेह आहेत.
- आग विझविल्यावर पाहिले की, जमिनीवर मृतदेह पडलेला होता. तेवढ्यात शेजाऱ्याने आवाज दिला की, वरच्या रूममध्येही पाहा.
- मी साथीदारांसह वर गेलो तेव्हा तेथे बेडवर एक मुलीचा मृतदेह पडलेला होता, जिच्या शरीरवर कोणतेही कापड नव्हते.
- तरुणीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला होता आणि तिच्या शरीरातून रक्तस्राव होत होता. तिच्यावर रेप झाल्याचे स्पष्ट दिसत होते. मृतदेहाजवळ घरातला कुत्रा बसलेला होता.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.