आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईनेच विहिरीत फेकले दूधपिते बाळ, म्हणाली- माझ्या जगण्यात ठरत होता अडथळा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी आईने आधी रडून-रडून खोटी कहाणी सांगितली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच खरे कारण सांगितले. - Divya Marathi
आरोपी आईने आधी रडून-रडून खोटी कहाणी सांगितली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच खरे कारण सांगितले.

बैकुंठपूर - आपल्या काळजाच्या तुकड्याला स्वत:च विहिरीत फेकणाऱ्या आईचे सत्य समोर आले आहे. ती मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मुलासाठी ढसाढसा रडत होती आणि लोकांना एका अज्ञाता व्यक्तीची खोटी कहाणी सांगत होती. बुधवारी चौकशीदरम्यान शेवटी तिचे पितळ उघडे पडले आणि तिने सर्व सत्य पोलिसांसमोर कथन केले.  

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना बैकुंठपूर जिल्ह्यातील तेंदुआ गावातील आहे. मंगळवारी येथे राहणाऱ्या कृत पटेलच्या घराचे बांधकाम सुरू होते. 
- येथे राहणारे कैलाश पटेल घरात सून काजल आण फक्त 3 महिन्यांची नात मंदीपला सोडून बाहेरून कुलूप लावून दुपारी 2 वाजता कृत पटेल यांच्या घराचे बांधकाम पाहायला गेले होते.
- यानंतर 3 वाजता ते घरी परतले आणि सुनेला हाक मारली, सुनेने काहीच उत्तर दिले नाही म्हणून ते विहिरीजवळ सुरू असलेला वीजपंप बंद करण्यासाठी गेले. 
- एवढ्यात त्यांनी पाहिले की, विहिरीत बाळाचा मृतदेह तरंगत होता. घरात गेल्यावर पाहिले तेव्हा सून काजल पोटावर झोपलेली होती आणि तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला होता.
- त्यांनी लगेच सुनेच्या तोंडाचा बोळा काढला, तेव्हा जी जोरजोरात ओरडू लागली. म्हणाली की, एक मास्क घातलेला माणूस घरात शिरला होता.
- तो पाठीमागून आला, मला वाटले का पतीच आले आहेत. त्याने पाठीमागून माझे तोंड दाबले आणि तोंडात कापडाचा बोळा कोंबला.
- मग मुलाला घेऊन गेला आणि विहिरीत फेकून फरार झाला. हे ऐकताच कैलाश पटेल यांनी शेजाऱ्यांना बोलावले आणि बाळाचा मृतदेह बाहेर काढला.
- सूचना मिळताच पोलिस आले आणि त्यांनी काजलला रुग्णालयात दाखल केले. चिमुकल्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
- शॉर्ट पीएम रिपोर्टमध्ये चिमुकल्याचा मृत्यू गुदमरल्याने आणि पाण्यात बुडून झाला होता. पोलिसांनी बाळाच्या आईची चौकशी केली तेव्हा ती तिच्याच खोट्या कहाणीत अडकत गेली.
- ती रडून-रडून आपल्या बाळाचे नाव घेत होती आणि त्याच्यासाठी तगमग सुरू असल्याचे दाखवत होती. पण पोलिसी खाक्या दाखवताच ती मोडून पडली आणि सगळे सत्य कबूल केले.

आराम पाहिजे होता आरोपी आईला
- आरोपी आई काजल म्हणाली की, मुलाला मी नीट सांभाळू शकत नव्हते. दुसरीकडे कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, तिला आरामशीर जीवन जगायचे होते.
- बाळच तिच्या जीवनात अडथळा ठरू लागले होते. म्हणूनच त्याची हत्या केली. या प्रकरणाचा खुलासा करताच पोलिस अधीक्षक निवेदिता पॉल शर्मा आणि उप पोलिस अधीक्षक सोनिया उके यांनी केला.

फोटो : दिनेश द्विवेदी

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...