आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटामुळे चिमुरड्याबरोबर पटरीवर झोपली महिला, शंभरच्या स्पीडने गेली रेल्वे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुऱ्हानपूर/नेपानगर - अलाहाबादची एक महिला तबस्सूम शनिवारी गोरखपूर-एलटीटी काशी एक्सप्रेसने मुंबईला जात होती. अचानक ती मध्यप्रदेशच्या नेपानगर स्टेशनवर उतरली आणि दीड महिन्याच्या बाळाला छातीशी धरून ती रेल्वे रुळावर लोटली. त्याचवेळी समोरून पुष्पक एक्सप्रेस शंभरच्या वेगाने येत होती. ही रेल्वे महिला आणि तिच्या बाळाच्या वरून ट्रॅकवरून निघून गेली. पण महिलेला किंवा बाळाला खरचटलेही नाही. 


नेपानगरमध्ये पुष्पक एक्सप्रेसचा स्टॉपेज नाही. त्यामुळे घटनेदरम्यान स्टेशनवर धावपळ उडाली होती. रेल्वे निघून गेल्यानंतर जेव्हा महिला आणि बाळ सुखरुप असल्याचे दिसले तेव्हा सर्व स्तब्ध झाले. जीआरपीच्या चौकशीत महिलेने सांगितले की, तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला आहे. त्यामुळे ती फार तणावात आहे. त्यातूनच हा प्रकार घडला. 

 

बातम्या आणखी आहेत...