आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: धोनीची पत्नी म्हणाली माझ्या जिवाला धोका, शस्त्र परवान्यासाठी केला अर्ज; Ms DhoniS Wife Sakshi Application For Arms License

धोनीची पत्नी म्हणाली- माझ्या जीवाला धोका, पिस्तुलाच्या परवान्यासाठी अर्ज केला दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीने स्वत:च्या जिवाला धोका असल्याचे सांगून शस्त्रास्त्र परवान्याची मागणी केली आहे. तिने पिस्तूल वा 0.32 रिवॉल्हरसाठी अर्ज केला आहे. साक्षी म्हणाली की, ते बहुतांश वेळ घरी एकटीच राहते. खासगी कामासाठी तिला इकडेतिकडे फिरावे लागते. यामुळे जिवाला नेहमी धोका राहतो. त्यामुळे उशीर न करता तिला शस्त्र खरेदीचा परवाना देण्यात यावा. तथापि, 9 वर्षांपूर्वी धोनीनेही लाइसेन्सी पिस्तूल खरेदी केली होती.

 

धोनीच्या निवासस्थानी तैनात राहतात 7 गार्ड
साक्षीने परवान्यासाठी मजिस्ट्रेट कार्यालयात अर्ज दाखल केला होता. चौकशीनंतर आढळले की, तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे तिचा अर्ज एसएसपी कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. धोनीच्या निवासस्थानी कायम शस्त्रधारी 7 गार्डसचा पहारा असतो. स्थानिक पोलिस स्टेशन इंचार्ज म्हणाले की, साक्षी धोनी जेव्हाही बाहेर निघतात तेव्हा या पोलिस स्टेशनला माहिती कळवली जाते. तसेही पोलिसांचे गस्ती पथक नेहमी त्यांच्या घराकडे गस्त घालत असते. 

 

बातम्या आणखी आहेत...