आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणताही जुना फीचर फोन देऊन फक्त 501 रुपयांत मिळेल नवा जियोफोन, अवघ्या 1 तासात इंस्टॉल होईल Jio गीगा फायबर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - रिलायन्स जियोची वार्षिक बैठक गुरुवारी मुंबईत सुरू आहे. यादरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स जियोने एक वर्षात आपल्या ग्राहकांची संख्या वाढवून दुप्पट केली आहे आणि कंपनीने दर महिन्याला 240 कोटी जीबी 4G डेटा आपल्या ग्राहकांना दिला आहे. ते म्हणाले की, त्यांच्या कंपनीने अडीच हजार कोटींची गुंतवणूक करून देशातील सर्वात मोठे नेटवर्क बनवले असून जियो भारतातील सर्वात वेगवान नेटवर्क आहे.

 

पुन्हा एकदा लोकप्रिय घोषणा
मुकेश अंबानी यांनी 15 वर्षांनंतर पुन्हा 501 रुपयांच्या मान्सून हंगामा ऑफरची घोषणा केली. यात कोणत्याही ब्रँडच्या जुन्या फीचर फोनच्या बदल्यात नवा जियो स्मार्टफोन मिळेल. कंपनीने जियो गीगा टीव्ही, गीगा फायबर सर्विस, गीगा राउटर आणि जियो सर्विलन्स सिस्टिम यासारखे नवे प्रॉडक्ट्स आणण्याची घोषणा केली आहे.

 

जियोचा नफा 20.6% वाढला
मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायंस जियोचा नफा 20.6% वाढून 36 हजार 75 कोटींपर्यंत पोहोचला आहे. ते म्हणाले की, रिलायन्स भारतातील सर्वात मोठी एक्स्पोर्टर कंपनी बनली आहे आणि एका वर्षात कंपनीने 42 हजार 553 कोटी रुपयांचा जीएसटी भरला आहे. ते म्हणाले की, आता त्यांच्या कंपनीचा उद्देश सर्व छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत डिजिटल टूल्स आणि तंत्रज्ञान पोहोचवण्याचा आहे.

 

25 मिलियन लोक वापरतात जियोफोन: 
मुकेश अंबानी म्हणाले की, एक वर्षातच देशभरातील 25 मिलियन लोक जियोफोनचा वापर करू लागले आहेत. दुसरीकडे आकाश अंबानी म्हणाले की, जियोफोनवर यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक यासारखे अॅप्सही चालतील. जे व्हॉइस कमांडला सपोर्ट करतील. मुकेश अंबानी म्हणाले की, जियोफोनवर यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकची फॅसिलिटी 15 ऑगस्टपासून मिळणे सुरू होईल.

 

फायबर ब्रॉडबँड सर्व्हिस गीगा फायबर लॉन्च:
रिलायन्सच्या वार्षिक मीटिंगमध्ये कंपनीने जियो फायबर ब्रॉडबैंड सर्विसही लॉन्च केली. ही 'जियो गीगा फाइबर' सर्विस नावाने ओळखली जाईल. मुकेश अंबानी म्हणाले की, जियो गीगा फायबर इंस्टॉल करण्यासाठी फक्त एक तासाचा वेळ लागेल. यामुळे घर पूर्णपणे हायटेक आणि स्मार्ट बनून जाईल. ते म्हणाले की, जियोची गीगा फाइबर सर्व्हिस देशभरातील 1100 शहरांमध्ये मिळेल. 15 ऑगस्टपासूनच जियो गीगा फायबर सर्व्हिससाठी रजिस्ट्रेशन सुरू केले जातील.

 

फक्त 501 रुपयांत मिळेल नवा जियोफोन: 
या मीटिंगमध्ये जियोफोन-2 ही लाँच करण्यात आला. याची किंमत 2,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तथापि, यासाठी मुकेश अंबानी यांनी 'मॉन्सून हंगामा' ऑफरही आणली आहे. याअंतर्गत जुन्या फीचर फोनला एक्सचेंज करून नवा जियोफोन फक्त 501 रुपयांत खरेदी करता येईल. हासुद्धा जुन्या फोनसारखा फीचर फोन आहे, परंतु यात पूर्वीपेक्षा जास्त सुविधा देण्यात येतील. ते म्हणाले की, जियोफोन-2 मध्ये भारतातील सर्व भाषा सपोर्ट करतील.

 

जियो गीगा टीव्हीही लॉन्च: 
मुकेश अंबानी यांनी यादरम्यान जियो गीगा टीव्ही लॉन्च करण्याची घोषणा केली. हा गीगा फाइबर सर्विसच्या मदतीने चालेल. ते म्हणाले की, या टीव्हीवर जगातील बेस्ट एजुकेशनल कंटेंट मिळेल. सोबतच याच्या मदतीने मुले शिक्षकांच्या मदतीशिवाय शकू शकतील. याशिवाय या टीव्हीच्या मदतीने डॉक्टर रुग्णांवर दूर राहूनही उपचार करू शकतील.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, हायएंड जियोफोन 2 चे फीचर्स व इतर Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...