आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिओ ऑफिसमध्ये मुकेश अंबानींना नाही केबीन, कर्मचाऱ्यांबरोबर बसून करतात काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांच्या बिझनेस आयडियाज प्रमाणेच त्यांचे जियोचे हेड ऑफिसही खास आहे. नुकतेच रिलायन्सच्या नव्या हेड ऑफिसचे काही फोटो समोर आले आहेत. ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुकेश अंबानी याठिकाणी सामान्य कर्मचाऱ्यांबरोबर बसून काम करतात. अंबानींनी त्यांच्या ऑफिसमध्ये केबीन कल्चर संपवले आहे. येथे ओपन ऑफिस कल्चरला त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. 

 

नवी मुंबईच्या ठाणे बेलापूर रोडवर तयार करण्यात आलेल्या जियोच्या कमर्शियल बिल्डिंगला हर्मन मिलर रीच अवॉर्ड मिळाला आहे. या आठ मजली इमारतीत अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ती वेगळी ठरते. जियोच्या या ऑफिसमध्ये सर्वकाही हायटेक आहे. याठिकाणी अनेक वस्तू स्क्रॅपद्वारे तयार करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर ज्या काळ्या पिवळ्या कॅब धावताना दिसतात, तशीच कॅबल स्क्रॅप मटेरिअलद्वारे ऑफिसमध्ये तयार केली आहे. 


21 अब्ज खर्च 
मीडिया रिपोर्ट्सनुसार या ऑफिससाठी सुमारे 21 अब्ज रुपये खर्च करण्यात आले आहे. मुंबईच्या रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये तयार करण्यात आलेल्या, 'रिलायन्स जियो' चे ऑफिस आतापर्यंतच्या रिलायन्सच्या ऑफिसेसपैकी सर्वात मोठे आहे. याठिकाणी जवळपास प्रत्येक इमारत काचेची आहे. त्याशिवाय कॅम्पसमध्ये मोठे लॉन, गेस्ट हाऊस आणि हॉटेलही आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, मुकेस अंबानींचे ओपन ऑफिस कल्चर..

बातम्या आणखी आहेत...